तुमचीही गाय किंवा म्हैस कागद, प्लास्टिक, माती खाते का ? मग ‘हा’ एक रामबाण उपाय तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dairy Farming : पशुपालन हा व्यवसाय फार पूर्वीपासून केला जातोय. शेतीशी निगडित असल्याने हा व्यवसाय करण्याकडे अनेक शेतकऱ्यांचा कल आहे. पशुपालनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देखील मिळत आहे. गाय आणि म्हशींचे संगोपन प्रामुख्याने दुग्ध उत्पादनासाठी केले जाते.

दुग्धोत्पादनातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. मात्र पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे वेगवेगळे संकट उभे होत आहे. विविध रोगांमुळे, पशुधनाच्या वाढत्या किमतीमुळे, पशुखाद्याच्या वाढत्या किमतीमुळे पशुपालक शेतकरी संकटात आले आहेत.

दरम्यान, दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांची दुधाळ गाय आणि म्हैस कागद, प्लास्टिक, माती खात असल्याची तक्रार केली जात आहे.

यामुळे आज आपण गाय किंवा म्हैस कागद, प्लास्टिक, माती का खाते तसेच जनावरांनी असे करू नये यासाठी काय केले पाहिजे याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

दुधाळ जनावरे माती का खातात ?

पशुचिकित्सकांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पशुचिकित्सकांनी म्हटल्याप्रमाणे, दुधाळ गाय किंवा म्हैस सतत माती जर खात असेल तर तिला पायका रोग झाला असल्याचे समजावे.

हा रोग प्रामुख्याने फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होतो. ज्या दुधाळ गायीमध्ये किंवा म्हशीमध्ये फॉस्फरसची कमतरता असते अशी गाय किंवा म्हैस सतत माती, प्लास्टिक, कागद खात असते.

जर तुमचीही गाय किंवा म्हैस अशाच आजाराने बाधित असेल तर तुम्ही सर्वप्रथम पशुचिकित्सकाकडून तुमच्या बाधित जनावरांची तपासणी करून घ्या.

यानंतर पशुचिकित्सकांच्या सल्ल्याने उपचार घ्या. पशु चिकित्सक सांगतात की, फॉस्फरसची कमतरता असेल आणि दुधाळ जनावर माती खात असेल तर बाधित दुधाळ गाय किंवा म्हशीला दररोज जंतुनाशक औषध दिले पाहिजे.

मात्र पशुचिकित्सकांच्या सल्ल्यानेच जंतुनाशक औषध द्यावे. तसेच अशा बाधित दुधाळ जनावरांना 40 ते 50 ग्रॅम खनिज मिश्रण दररोज दिले पाहिजे.

ऍग्रीमिन, कॅल्डीमिन, मिल्कमिन, मिनरलफोर्ट, मिनिमिक्स अशी खनिज मिश्रण जनावरांना दररोज 40 ते 50 ग्रॅम या प्रमाणात दिली गेली पाहिजे. मात्र जंतुनाशक आणि खनिज मिश्रण देताना एकदा पशुचिकितकांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच हा प्रयोग करा.