डेअरी व्यवसायात अफलातून प्रयोग ! उच्चशिक्षित तरुणी दुमजली गोठा उभारून कमवतेय वर्षाकाठी करोडो रुपये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा, सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याला महती प्राप्त आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव देखील आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहतात. आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील एका सुशिक्षित तरुणीचा शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पशुपालन व्यवसायातला असाच एक अभिनव प्रयोग जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आज आपण ज्या तरुणीची यशोगाथा जाणून घेणार आहोत तिने योग्य वयाच्या 23 व्या वर्षी म्हशीसाठी दुमजली गोठा उभारला आहे. आजच्या घडीला ही तरुणी यशस्वीरीत्या दुग्ध व्यवसाय करत असून तिला वर्षाकाठी करोडो रुपयांची कमाई होत आहे. श्रद्धा ढवण असं या तरुणीचं नाव असून ती पारनेर तालुक्यातील निघोज या गावी राहते.

खरं पाहता श्रद्धा यांनी दुमजली गोठा उभारला म्हणून त्या चर्चेत आल्या नसून त्यांनी डेअरी व्यवसायात ज्या पद्धतीने काबाड-कष्ट केले आहेत त्यामुळे त्या चर्चेत आल्यात. श्रद्धा यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताचीचं होती, शिवाय वडील अपंग आणि भावंडे लहान त्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी कमी वयात श्रद्धा यांना आपल्या खांद्यावर उचलावी लागली.

कॉलेजला गेल्यापासून श्रद्धांने आपल्या वडिलांनी सुरू केलेला दूध व्यवसाय सांभाळला. कॉलेजला जाण्याआधी श्रद्धा दूध घालायला जात असत. मात्र तीला हे काम करताना लाज वाटतं. श्रद्धा ही पिकअप चालवत दूध घालायला जात. परंतु ज्यावेळी लोकांकडून कौतुकाचा शब्द तिला ऐकायला मिळू लागला तेव्हापासून ते हे काम अभिमानाने करू लागले.

यामुळे मोटिवेट झालेली श्रद्धा यांनी दुग्ध व्यवसायात क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला होता. या अनुषंगाने त्यांनी कठोर मेहनत घेतली. श्रद्धा यांनी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेला एक म्हशीपासूनचा हा दुग्ध व्यवसाय ८० म्हशी पर्यंत नेऊन ठेवला. विशेष म्हणजे श्रद्धाने b.sc चे शिक्षण घेतलं आहे.

एवढेच नाही तर सुरुवातीला स्वतः श्रद्धा म्हशीचे दूध काढत असत आणि दूध घालायला स्वतः जात असत. सध्याच्या परिस्थितीला श्रद्धा यांच्याकडे एकूण 80 म्हशी असून या म्हशीसाठी दुमजली गोठा त्यांनी बांधला आहे. यामुळे श्रद्धा यांची चांगलीचं चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. निश्चितच श्रद्धा यांनी डेअरी व्यवसायात केलेली ही कामगिरी इतरांसाठी प्रेरक अशी ठरणारी आहे.