दुःखद ! अहमदनगर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढताच ; समोर आली धक्कादायक आकडेवारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Suicide In Ahmednagar : अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्रात एक नावाजलेला जिल्हा. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यातच. जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यभर चर्चेत असतात. विशेष म्हणजे येथील शेतकरी बहुतांशी सधन आहेत.

अहमदनगर जिल्हा हा सधन जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा हा वाढत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

आता हाती आलेल्या नवीन आकडेवारीनुसार 2021 साली जिल्ह्यात  71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर 2022 मध्ये आतापर्यंत 94 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.

निश्चितच, जलसंधारणाच्या कामात आघाडीवर असलेल्या, सर्वाधिक साखर कारखान्यांचा तमगा मिरवत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या केवळ जिल्ह्यासाठीच नाही तर राज्यभरासाठी एक चिंतेचा विषय सिद्ध होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निश्चितच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून मदत मिळाली असेल मात्र केवळ मदत देऊन तात्पुरती उपायोजना करून भागणार नसून यावर प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

मराठवाडा आणि विदर्भात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येमुळे आधीच महाराष्ट्राच्या गौरवमयीन इतिहासावर कलंक लागला आहे आणि आता याच लोन अहमदनगर सारख्या सधन जिल्ह्यातही पसरत असल्याने कुठे ना कुठे शेतकरी प्रश्नांवर शासन अपयशी असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील शेतकरी सधन आहेत मात्र तरीही कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचे उघडकीस आल आहे. निश्चितच यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. खरं पाहता आपला देश हा कृषिप्रधान देश. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित विशेष म्हणजे देशाची अर्थव्यवस्था ही देखील कृषीप्रधान आहे.

या कृषीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा मात्र असे असले तरी बळीराजा कर्जबाजारीपणामुळे आणि आर्थिक तंगी मुळे आपले जीवन संपवत आहे, हे वास्तव पाहिले तर आपला भारत देश खरंच कृषी प्रधान देश आहे का? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.