Farmer Crop Loan: ठाकरे आले ॲक्शन मोडमध्ये, शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या; मुख्यमंत्री साहेबांचा बँकेला इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi News Marathi: मान्सूनचं (Mansoon) केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी दणक्यात आगमन झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीसाठी आता पूर्व मशागत (Pre-Cultivation) करण्यासाठी जोमात तयारी सुरू केली आहे.

शेतकरी बांधवांसमवेतच (Farmers) शासन दरबारी (Government) देखील खरीप हंगामासाठी नियोजनाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची नितांत आवश्यकता भासत असते.

अशा परिस्थितीत माय-बाप शासनाने देखील शेतकऱ्यांना भांडवल (Capital For Farmers) उपलब्ध व्हावे यासाठी पीक कर्जाची (Crop Loan) सुविधा करून दिली आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी राजधानी मुंबईत बँकर्स समितीची बैठक घेतली.

सदर बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत राज्याच्या 2022-23 च्या 26 लाख 33 हजार कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्याला मंजूरी देण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, बैठकीत मंजूर केल्या गेलेल्या निधीपैकी प्राधान्य क्षेत्रासाठी 5 लाख 22 हजार 68 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली आहे. तर इतर क्षेत्रासाठीच्या 21 लाख 10 हजार 932 कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 45.37 टक्के वाढ केली गेली असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करत आहेत.

प्राधान्य क्षेत्रासाठीच्या निधीमध्ये कृषी क्षेत्रासाठी 1 लाख 26 हजार 58 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक कर्ज म्हंणून 64 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर मुदत कर्जाच्या 62 हजार 58 कोटी रुपयांचा समावेश असल्याची माहिती आता सार्वजनिक झाली आहे.

विशेष म्हणजे बैठकीदरम्यान माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी बँकांना सूचना देत शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी आवश्यक पीक कर्जाची वेळेत उपलब्धता करून द्यावी असे आदेश देखील दिले आहेत. यासाठी बँकांनी जिल्हाधिकार्‍यांची मदत घेत स्थानिक पातळीवर उपाययोजना कराव्यात असा अनमोल सल्ला देखील यावेळी ठाकरे यांनी बँकांना दिला आहे.

कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाअधिक कर्जाची उपलब्धता शेतकऱ्यांना करून दिली जावी असे देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी बँकांना सांगितलं. निश्चितच खरिपाची तयारी करत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासा देणारी बाब असून, मुख्यमंत्री यांच्या सूचनेनंतर निश्चितच शेतकऱ्यांना लवकर पिक कर्ज उपलब्ध होईल अशी आशा आता जाणकार व्यक्त करत आहेत.