शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! गोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी 29 कोटींची निविदा ; ‘या’ शेतकऱ्यांचा होणार फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Godawari Kalwa : शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी पाण्याची नितांत गरज असते. त्यासाठी शासनाने अनेक जलसंधारणाची कामे हाती घेतलेले असतात. जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता होते. आता गोदावरी कालव्याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

गोदावरी डाव्या उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 29.17 कोटीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे कालव्याच्या दुरुस्तीला वेग येणार आहे. निविदाबाबत कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वतः माहिती दिली आहे.खरं पाहता गोदावरी उजवा डावा कालवा हा ब्रिटिश कालीन. याची निर्मिती ही 100 वर्षांपूर्वी झालेली.

या कालव्याच आयुर्मान वाढलेल असल्याने याची दुरुस्ती करणे अनिवार्य आहे. दुरुस्ती अभावी या कालव्याचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी अपुर पडत होतं. याची वहन क्षमता देखील कमी झाली होती. या आवर्तनावर अवलंबून असलेल्या अनेक पाणीपुरवठा योजनेला देखील याचा धक्का बसत होता. वारंवार कालवे फुटण्याच्या घटना देखील घडत होत्या. त्यामुळे या कालव्यांची दुरुस्ती करणे अतिशय आवश्यक आहे.

कालव्याच आयुर्मान अधिक झाल्यामुळे ठिकठिकाणी लिकेज होत होते आणि पाण्याचा अपव्यय होत होता. परिणामी सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नव्हते. यामुळे या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचा मोठा तोटा होत होता. अशा परिस्थितीत गोदावरी डावा उजवा कालवा लवकरात लवकर दुरुस्ती केली जावी अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली होती.

आमदार आशुतोष काळे यांनी देखील या शेतकऱ्यांच्या मागणीला नेहमीच दुजोरा दिला आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी आमदार महोदय गेल्या अनेक वर्षांपासून झटत आहेत. आशुतोष काळे यांनी जनतेला विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी आपण कालव्याची दुरुस्ती करू असं वचनही दिल आहे. या अनुषंगाने त्यांनी पाठपुरावा करत महाविकास आघाडी सरकारकडून 300 कोटी रुपयांची मंजुरी मिळवून घेतली आहे.

यापैकी 36 कोटींच्या निधीचे काम प्रगतीपथावर आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये देखील दुरुस्तीचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे उर्वरित कालवा दुरुस्तीसाठी लवकरात लवकर निविदा निघाल्या पाहिजे यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. आता या पाठपुराव्याला यश आले असून 29.17 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.

लवकरच या निविदांना मंजुरी मिळणार असून डावा-उजवा गोदावरी कालवा दुरुस्तीचे काम जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. निश्चितच या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. निश्चितच गोदावरी उजवा डावा कालवा दुरुस्ती आता लवकरच पूर्ण होईल आणि शेतकरी बांधवांचा पाण्याचा प्रश्न मिटेल.