Monsoon Update: आज राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची विश्रांती तर ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: देशाच्या बहुतांश भागात मान्सून (Monsoon) सक्रिय आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब महाराष्ट्रासह (Maharashtra Weather Update) बहुतांश राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD) जारी केला आहे.

आपल्या महाराष्ट्रात मान्सूनच्या दुसऱ्या चरणातील पावसाने (Rain) अक्षरश थैमान माजवलं आहे. आज देखील राज्यात पाऊस (Rain alert) कायम राहणार असून भारतीय हवामान विभागाने उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंतच्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तराखंडबद्दल बोलायचे झाले तर येथे हलका पाऊस पडेल, तर आकाश ढगाळ राहणार आहे.

उत्तर प्रदेशातील हवामान कसे असेल

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.  त्याच वेळी, 20-21 ऑगस्ट रोजी कानपूर, लखनऊ, मेरठ, वाराणसी आणि प्रयागराजसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. पूर्व उत्तर प्रदेशात हवामान आल्हाददायक राहील. पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

कानपूरच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये 19-20 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर लखनऊ, वाराणसी, प्रयागराजसह अनेक जिल्ह्यांमध्ये 20-21 ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गुजरात, दक्षिण राजस्थान, अंदमान आणि निकोबारमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, विदर्भ, छत्तीसगड, ओडिशाच्या उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. कर्नाटक, झारखंडमध्येही पाऊस अपेक्षित आहे. हवामान खात्यानुसार, बुधवारी दिल्ली-एनसीआर अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्यता नाही, पण उकाड्यापासून दिलासा मिळेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात या ठिकाणी बरसणार वरुणराजा

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार आज महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) पूर्व विदर्भात तसेच पूर्व मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Weather Update) आहे. उर्वरित राज्यात प्रामुख्याने उघडीप राहील मात्र काही ठिकाणी श्रावण सरी राहणार आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने भारतीय हवामान विभागाने संबंधीत जिल्ह्यांना येलो ऍलर्ट देखील जारी केला आहे