Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज…!! हवामानात मोठा बदल, ऑगस्टमध्ये या दिवशी राज्यात पाऊस, तर या दिवशी राज्यात पावसाची उसंत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon Update: राज्यात पावसाने (Rain) आता पंधरा दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरीदेखील उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाची (Monsoon) उसंत बघायला मिळत आहे.

मात्र काल रविवारी महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते जोरदार पावसाच्या (Monsoon News) सऱ्या बघायला मिळाल्यात. राज्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने पावसाचा जोर कमी असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या मते, आज सोमवारी मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या नवीनतम अंदाजानुसार निश्चितच राज्यातील काही भागात तुरलक ठिकाणी पाऊस कोसळणार असला तरीदेखील उर्वरित भागात आज देखील हवामान कोरडे राहणार आहे.

राज्यात पावसाने उघडीप दिली, त्यामुळे तापमानात मोठी वाढ झाली आणि यामुळे उकाडा देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक गजबजलेलं नाव म्हणजेच पंजाबराव डख(Panjabrao Dakh).

परभणी भूमिपुत्र पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या नवीनतम सुधारित अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj), आज आणि उद्या राज्यात पावसाची उघडीप राहणार आहे. मात्र उद्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता देखील पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी वर्तवली आहे.

मित्रांनो, 2-3 जुलै दरम्यान राज्यातील कोल्हापूर सांगली सोलापूर दाराशी परभणी बीड नांदेड यवतमाळ नागपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता पंजाबरावांनी (Panjabrao Dakh News) वर्तवली आहे. त्यानंतर चार पाच आणि सहा ऑगस्ट राज्यात सर्वत्र पाऊस राहणार आहे मात्र पावसाचा सर्वाधिक जोर राजधानी मुंबई पुणे आणि नाशिक येथे बघायला मिळणार.

याशिवाय सात ऑगस्ट पासून 9 ऑगस्ट पर्यंत राज्यात सगळीकडे पावसाची शक्यता पंजाब रावांनी वर्तवली आहे. आज आणि उद्या पावसाची उघडीप राहणार असल्याने पंजाबराव यांनी शेतकरी बांधवांना आपली शेतीची कामे करून घेण्याचा सल्ला दिला आहे.