Sugarcane Farming : शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ टेक्निकने ऊस लागवड करा ; 30 टक्के उसाचे उत्पादन वाढणार, कस ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugarcane Farming : देशात उसाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. शेतकरी बांधवांसाठी ऊस हे प्रमुख नगदी पिकांपैकी एक आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील ऊस या नगदी पिकावर विसंबून असल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात तर उसाची विक्रमी लागवड करण्यात आली होती.

हेच कारण होते की गेल्या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेण्यात आले. आता साखर उत्पादनात महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य बनले आहे. त्याच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना दुप्पट नफा मिळत आहे, कारण देशातील साखरेचा हा एकमेव मुख्य स्त्रोत आहे.

या कारणास्तव शेतकरी ऊस हंगामात (ऑक्टोबर-नोव्हेंबर) जास्तीत जास्त उसाची लागवड करतात. ऊस हे एक शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जात असल्याने आपल्या राज्यातही ऊस लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हीही तुमच्या शेतीतून चांगला नफा मिळवण्यासाठी उसाची लागवड करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख विशेष तुमच्यासाठी बनवण्यात आला आहे.

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. एका अहवालात असे दिसून आले आहे की एकट्या भारतात ऊस पिकाची अंदाजे उत्पादकता 77.6 टन प्रति हेक्टर आहे आणि उत्पादन क्षमता सुमारे 306 दशलक्ष टन आहे.

बहुधा प्रत्येक शेतकरी ऊसाची लागवड करतो, पण चांगला नफा तोच शेतकरी मिळवतो जो चांगल्या आणि प्रगत टेक्निकने उसाची शेती करतो. तुम्हीही तुमच्या शेतात उसाची प्रगत पद्धत अवलंबून ऊस पेरावा म्हणजे तुम्हालाही दुहेरी फायदा मिळू शकेल.

ट्रेंच टेक्निकने ऊस लागवड केल्यास उत्पादनात 30 टक्के वाढ होणार 

ऊस पिकातून अधिक नफा मिळवायचा असेल तर ट्रेंच टेक्निकचा अवलंब करून ३० टक्क्यांहून अधिक उसाचे उत्पादन मिळवता येते. या पद्धतीसाठी तुम्हाला फार काही करण्याचीही गरज नाही.

ही एक पारंपारिक पद्धत आहे, ज्यामध्ये पाणी खूपच कमी प्रमाणात वापरले जात असते.

या पद्धतीने उसात तण कमी येते आणि खतांचा योग्य वापर होतो.

यामध्ये शेतात ऊस पेरणीसाठी सुमारे 1 फूट खोल व 1 फूट रुंद नाले तयार करावे लागतात.

यानंतर या नाल्यांमध्ये 2 ते 3 डोळे असलेला किमान 25 सेमी लांबीच ऊस बेन लावल जात.

या पद्धतीत उसापासून उसाचे अंतर 10 सेंमी आणि नाल्यांचे अंतर 4 फुटांपर्यंत असावे.

या पद्धतीचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एकाच वेळी दोन पिके घेऊ शकता. शेतकरी उसासोबत इतर कडधान्य पिकेही आंतरपीक म्हणून लावू शकतात. असे केल्याने शेतकऱ्याला दुप्पट नफा मिळण्याबरोबरच शेताची सुपीकताही वाढेल.

ट्रेंच टेक्निकने ऊस लागवड करताना आवश्यक खताची मात्रा

जर तुम्ही तुमच्या शेतात ट्रेंच पद्धतीने उसाची लागवड करत असाल, तर तुम्ही एक एकर जमिनीसाठी सुमारे 80 किलो नायट्रोजन, 30 किलो फॉस्फरस आणि 25 किलो पोटॅश टाकावे. लक्षात ठेवा की पेरणीच्या वेळी, आपल्याला पिकास एक तृतीयांश नायट्रोजन घालावे लागेल. जेणेकरून पिकाची चांगली तयारी करता येईल. यामुळे उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होत असते.