कृषी

इंजीनियरिंग आणि बीएससी ऍग्री पूर्ण करून सागर उतरला शेतीत! पिकांची विविधता जपत शेतीतून साधली आर्थिक समृद्धी

Published by
Ajay Patil

बेरोजगारी हा भारतीय अर्थव्यवस्थे पुढील एक ज्वलंत प्रश्न असून दरवर्षी पदवी घेऊन शाळा कॉलेजमधून बाहेर निघणारे असंख्य तरुण-तरुणी आणि त्यामानाने उपलब्ध नोकऱ्याची संख्या खूप कमी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे.

त्यामुळे आता बेरोजगारीच्या प्रश्नावर मात करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक तरुण हे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये अनेक तरुण आता शेतीकडे वळत असून शेती आणि शेती सोबत असलेली जोडधंदे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केले जात असून त्यातून आर्थिक समृद्धी देखील साधल्याचे अनेक उदाहरणे आपल्याला आता दिसून यायला लागले आहेत.

तरुण आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्याकारणाने भरघोस उत्पादन मिळवत आहेत. याच मुद्द्याला तर आपण नंदुरबार जिल्ह्यातील कोठली या गावच्या सागर शांतीलाल पाटील या तरुणाची यशोगाथा पाहिले

तर तर याने उच्च शिक्षण घेऊन देखील शेती करण्याचे निश्चित केले व बारा एकर शेती मधून पिकांची विविधता जोपासत हा तरुण लाखो रुपयांचे उत्पन्न शेतीमधून मिळवत आहे. या लेखात आपण सागर पाटीलची यशोगाथा जाणून घेणार आहोत.

 बारा एकरमध्ये जोपासली पिकांची विविधता

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार जिल्ह्यातील कोठली या गावचा सागर शांतीलाल पाटील यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे व त्यासोबतच बीएससी ऍग्री ही पदवी देखील मिळवली. परंतु शिक्षणाच्या बाबतीत एवढ्या मोठ्या दोन पदव्या हातात असताना मात्र त्याने नोकरीची वाट न करता शेतीमध्ये उतरण्याचे ठरवले.

याकरिता त्याने स्वतःमध्ये असलेले ज्ञान आणि बीएससी ऍग्री मधून शेतीसंबंधी मिळालेले ज्ञानाचा वापर शेतीत करण्याचे ठरवले व त्या दृष्टिकोनातून शेतीमध्ये सुधारणा घडवून आणल्या. भविष्यकाळामध्ये दुष्काळाचे आवाहन पेलता यावे याकरिता सगळ्यात अगोदर शेतामध्ये पाण्याची व्यवस्था मजबूत करण्याकडे कल वळवला.

त्यानंतर विकेल ते पिकेल या तत्त्वावर त्याने बाजारपेठेचा अभ्यास करून कुठल्या मालाला मागणी जास्त असते हे ओळखून शेतामध्ये पिकांचे नियोजन करण्याचे ठरवले. तसेच सुरुवात करत असताना त्यांनी अनुभवाने केळी व पपई सारख्या फळ पिकामध्ये  आणि मिरची सारख्या भाजीपाला पिकामध्ये एक प्रकारची मास्टरी संपादन केली.

यामध्ये शेतीत व्यवस्थित नियोजन करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. शेतीमध्ये येणाऱ्या प्रमुख समस्या आणि अडथळ्यांचा अभ्यास करून त्या दूर करून शेती नफ्याची करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले व सागरला ते शक्य देखील झाले. सागर पाटीलने त्याच्याकडे असलेल्या बारा एकर शेतीमध्ये विविध प्रकारची फळ पिके

व भाजीपाला पिकांची लागवड करून पिकांमध्ये विविधता जोपासली. बारा एकरमध्ये कारली तीन एकर, तीन एकर पपई, तीन एकर केळी आणि मिरची तीन एकर  अशा पद्धतीने पिकांची नियोजन केले व पाणी आणि खत व्यवस्थापना सारख्या महत्त्वाच्या बाबी उत्तम पद्धतीने केल्या व आधुनिक पद्धतीने शेती केली.

या सगळ्या नियोजनाचा सकारात्मक परिणाम म्हणून शेतीतून सागर पाटील यांना भरघोस असे उत्पादन मिळत असून ते योग्य प्रकारे आर्थिक उत्पन्न देखील मिळवत आहेत. सागर पाटील यांनी दाखवून दिले की, नोकरीच्या मागे न लागता आपल्या ज्ञानाचा वापर करून अभ्यासू पद्धतीने शेती केली

तर शेतकऱ्यांचे जीवनमान कशा पद्धतीने उंचावू शकते?व्यवस्थित नियोजन व ज्ञानाचा वापर आणि प्रामुख्याने बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली पिकांची लागवड कशी फायद्याचे ठरते? हे सागर पाटील यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.

Ajay Patil