22 वर्षाच्या तरुणाने ‘या’ फुलाच्या लागवडीतून चार महिन्यात कमावले 8 लाख! कसे केले शक्य? वाचा यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोठ्या प्रमाणावर तरुणाई आता कृषी क्षेत्राकडे पाऊल ठेवताना दिसून येत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याची किमया तरुणांनी साध्य करून दाखवली आहे. अनेक उच्चशिक्षित तरुण आता कृषी क्षेत्रात आल्यानंतर कृषी क्षेत्राचा फार चेहरामोहराच बदलून गेल्याचे चित्र आहे.

पारंपरिक पिकांना फाटा देत आजकालची तरुणाई अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड करताना दिसून येत असून यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराने भाजीपाला लागवड तसेच फुल पिकांची लागवड विविध फळबागांच्या लागवडीमध्ये तरुणाई पुढे सरसावल्याचे चित्र आहे.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण गौरव कुमार या उत्तर प्रदेश राज्यातील मलिहाबाद जिल्ह्यातील ढकवा या गावचा रहिवासी असलेल्या तरुणाची यशोगाथा पाहिली तर त्याने डी फार्मसी पूर्ण केली असून शिक्षण घेत असतानाच तो शेती करत आहे. याच तरुणाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 फुलशेतीतून कमावले चार महिन्यात आठ लाख

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील मलिहाबाद येथील ढकवा या गावचा रहिवासी असलेला गौरव कुमार त्याने बारावीनंतर डी फार्मसी चे शिक्षण घेतले व शिक्षण घेत असताना तो आता शेतीवर पूर्णपणे लक्ष देत असून उत्तम पद्धतीने शेती करत आहे.

गौरवची घरची कौटुंबिक पार्श्वभूमी ही  शेतीची असल्यामुळे त्याचे वडील शेतामध्ये भात आणि गव्हाचे पिक प्रमुख्याने घेत असायचे. परंतु यामध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी मिळून अनेकदा नुकसान व्हायचे. या समस्येवर उपाय म्हणून गौरवने वडिलांना मदत करण्याच्या उद्देशाने सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर च्या माध्यमातून फुल शेती विषयीची पूर्ण माहिती घेतली

व भात आणि गहू पिकाऐवजी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला. अगोदर गौरवच्या या निर्णयाला वडिलांनी नापसंती दाखवली. परंतु नंतर व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर वडिलांनी त्याला होकार दिला व तेव्हा गौरव अठरा वर्षाचा होता तेव्हाच त्यांनी फुलशेती करायला सुरुवात केली. आता त्याने ग्लॅडीओलस या फुलांच्या लागवडीतून चार महिन्यांमध्ये 8 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवले आहे.

 ग्लॅडिओलस फुल पिकाचे वैशिष्ट्ये

ग्लाडीओलस या फुल पिकाविषयी माहिती देताना गौरव म्हणतो की, या फुलाची लागवड साधारणपणे सप्टेंबर पासून सुरू होते व ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर तर कधीकधी जानेवारीपर्यंत या या फुलांची काढणी सुरू राहते व चार महिन्यात चार ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.

जसे आजकाल इतर तरुण शेतीकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत व आधुनिक पद्धतीने शेती करून लाखो रुपयांची कमाई करत आहेत अगदी त्याच पद्धतीने गौरवने सुद्धा उच्च शिक्षण घेत असताना शेती व्यवसाय जपायचे ठरवले व आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय सुरू केला. ग्लाडीओलस फुल पिकाची लागवड करून त्यांनी अगदी कमी वयामध्ये अनन्यसाधारण असे यश मिळवले.