Aadhaar card : आधार कार्ड हरवले आहे? काळजी करू नका, या सोप्या पद्धतीने करा डाउनलोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar card : भारत सरकारकडून देशातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. कोणत्याही ठिकाणी कागदपत्रे द्यायची असतील तर सर्वात प्रथम आधारकार्ड मागितले जाते.

आधार कार्डबाबत केंद्र सरकारकडून दिवसेंदिवस नवीन नियमावली जाहीर केली जात आहे. तसेच देशातील सर्व पॅनकार्डधारकांना आणि रेशन कार्डधारकांना आधार लिंकिंग करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की आधार कार्डचे महत्व किती आहे.

पण अनेकदा आधार कार्ड हरवले जाते किंवा खराब होते. पण आधार कार्ड नसेल तर अनेक कामे रखडून पडू शकतात. त्यामुळे ते असणे आवश्यकच बनले आहे. पण आधार कार्ड हरवले किंवा खराब झाले तरी टेन्शन नाही.

आधार कार्ड हरवले तरी तुम्ही ते डाउनलोड करून करून ठेऊ शकता. तुम्ही आधार पीव्हीसी कार्ड डाउनलोड करू शकता.आधार कार्ड डाउनलोड करण्याचे अनेक मार्ग आहेत ते तुम्ही जाणून घेऊ शकता.

जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर तुमच्याकडे त्याचा १२ अंकी आधार नंबर किंवा 28 अंकी नावनोंदणी आयडी क्रमांक असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

तुमच्याकडे हे दोन्ही नंबर असतील तर ई-आधार डाउनलोड करू शकता. ई-आधार डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला प्रथम नावनोंदणी आयडी पुनर्प्राप्त करणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

नावनोंदणी आयडी कसा मिळवायचा-

  • नावनोंदणी आयडी मिळविण्यासाठी, सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • त्यानंतर तुमच्या मोबाइल फोनवर आधार मिळवा हा पर्याय निवडा.
  • यानंतर एनरोलमेंट आयडी पुनर्प्राप्ती पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे सर्व तपशील भरा आणि पाठवा OTP पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल जो तुम्हाला टाकायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एनरोलमेंट आयडी किंवा आधार क्रमांक मिळेल.

आधार कार्ड कसे डाउनलोड करावे?

  • आधार डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • यानंतर तुम्ही डाउनलोड आधार पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा एनरोलमेंट आयडी टाका.
  • यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
  • यानंतर OTP टाका.
  • तुमचे ई-आधार डाउनलोड केले जाईल. त्याची प्रिंट काढा.