अहमदनगर ब्रेकींग: मकरसंक्रातीच्या दिवशी सोनसाखळी चोरट्यांची धूम; महिलेच्या गळ्यातून ओरबडले सात तोळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  सक्रांतीच्या सणानिमित्त गळ्यात दागिणे घालून मंदिरात देवदर्शनासाठी गेलेल्या महिलांना चांगलेच महागात पडले. अहमदनगर शहरात धूमस्टाईलने सोन्यचे मंगळसूत्र, गंठण चोरून नेल्याच्या दोन घटना शुक्रवारी दुपारी घडल्या.

केडगाव उपनगरात दुचाकीवर जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील तीन तोळे आणि भिंगार उपनगरात महिलेच्या गळ्यातील चार तोळे दुचाकीवरील दोघांनी ओरबडले.

दरम्यान दोन्ही घटनांमधील चोरटे एकच असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत.शुक्रवार, 14 जानेवारी मकरसंक्रांत असल्याने महिला देव दर्शनासाठी बाहेर पडल्या होत्या.

हीच संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिणे लंपास केले. अंकीता ओंकार वाघस्कर (वय 26 रा. वडारवाडी, भिंगार) या त्यांची मैत्रिण योगिता धस यांच्यासोबत दुचाकीवर केडगाव येथे देव दर्शनासाठी गेल्या होत्या.

देवीरोडने घरी परत जात असताना दुपारी पावणे तीन वाजता विट्टभट्टीजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन चोरट्यांनी अंकीता यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले.

याप्रकरणी अंकीता यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली आहे. दुसरी घटना भिंगार उपनगरातील सारसनगर परिसरात कानडे मळा येथे घडली.

येथील एका महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबडून नेले. त्या महिलेने आरडाओरडा केला; पण चोरटे दुचाकीवरून वेगात गेले.

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान याप्रकरणी संबंधीत महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.