अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस अधिकाऱ्याला ‘चोर’ समजून मारहाण,तब्बल इतक्या जणांवर गुन्हा दाखल !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- जामखेड तालुक्यातील अरणगाव व परिसरात गावरान कोंबडी खरेदी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघेजण चारचाकी वाहनातून आले होते.

ग्रामस्थांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन न थांबल्याने ‘चोर-दरोडेखोर’ समजून स्थानिक दुचाकीस्वारांनी वाहनाला दुचाकी आडवी घालून वाहन थांबवून सहायक पोलिस निरीक्षक आणि सोबतच्यांना जमलेल्या २० ते २५ जणांनी सदर वाहनावर दगड मारून वाहनातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चौघांना बाहेर काढून लोखंडी रॉड, बांबू, दगड व काठीने मारहाण केली.

अरणगाव सरपंच वेळीच आल्याने त्यांनी मारहाण करणाऱ्या जमावातून पोलीस अधिकाऱ्यांसह चार जणांना सोडवले. याबाबत जामखेड पोलीसात खुनाच्या प्रयत्नासह १२ प्रकारचे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यात जाताना वाटेत बीड जिल्हातील आष्टी तालुका लागते. सदर प्रकाराचा प्रवास हा दोन्ही जिल्हा हद्दीतील आहे.

याबाबत जामखेड पोलीसांत विशाल भानुदास कांबळे (रा. भिमनगर ता. आष्टी, जि. बीड) यांनी फिर्याद दिली की, आष्टी तालुक्यातील पांडेगवहाण येथील वस्तीवर गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय असून खेडोपाडी जाऊन कोंबडी खरेदी करत असतो.

शुक्रवार दि.६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता जवळच असलेल्या अरणगाव व परिसरातून कोंबड्या खरेदीसाठी इंडोगो कारमध्ये (क्रमांक एम एच ०६ – ५५०३) भाऊ बुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे,

सासरे संजय विठ्ठल निकाळजे व सुनिल निकाळजे यांच्यासमवेत खेडोपाडी गेलो होतो पण कोंबड्या न मिळाल्याने अरणगाव बसस्थानक येथे आल्यानंतर मोटारसायकल वरून डबलशीट आलेल्या इसमांनी कारला दुचाकी आडवी लावून शिवीगाळ करून आम्हाला गाडीतून खाली उतरण्यास धमकावले.

यावेळी बाळासाहेब रावसाहेब मिसाळ, डॉ. सुरज रामकिसन जायभाय, राजु तुकाराम जायभाय, तुकाराम जायभाय, रामकिसन सोनबा जायभाय, मधुकर दत्तू जायभाय, शिवाजी जायभाय (पिकअप मालक), बबन भगवान दराडे, सतिश ( पूर्ण नाव माहीत नाही) रा. वंजारवाडी व इतर २० ते २५ जणांनी आमच्या गाडीवर मोठमोठे दगडे मारून काचा फोडल्या व बळजबरीने गाडीचे दरवाजे उघडून आम्हाला बाहेर खेचून त्यांच्या हातातील लोखंडी रॉड, बांबू,

दगडाने व काठीने मारहाण केली त्यातील काहींनी आमच्या खिशातील ५० हजार रूपये हिसकावून घेऊन जबर मारहाण करीत होते. माझा भाऊ किरण कांबळे हा सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे असे सांगत होता तरीही बेकायदा मंडळी मारहाण करीत होते.

यादरम्यान तेथे अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे व त्यांचे कार्यकर्ते आले व त्यांनी आम्हाला सोडवले. अशी फिर्याद विशाल भानुदास कांबळे यांनी दाखल केली यावरून पोलीसांनी भादवी कलम ३०७,३४१, ३२९, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५००, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचे शोधपथक आरोपींचा शोध घेत आहे.