अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात एसटी बसवर दगडफेक; बस मधील एका महिलेस दगड लागल्याने….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात व्यक्तीने एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली आहे. या दगडफेकीत एक महिलेला डोक्यात दगड लागल्याने महिला जखमी झाली आहे.

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा चालू असलेला संप अद्यापही मिटलेला नसून राज्य शासनाकडून कारवाईचा इशारा देण्यात आल्याने काही आगारांमधील कर्मचारी सेवेत रुजू होऊ लागले आहेत.

कमी प्रमाणात का होईना पण बस वाहतूक सुरू झाली असून, अशातच संगमनेर तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर पिंपळगाव बसवंत आगाराची पुण्याला जाणारी बस शुक्रवारी ही संगमनेरपासून पुण्याकडे जात होती.

दुपारच्या सुमारास ही बस चंदनापुरी घाटात आली असता घाटाच्या पायथ्याशी असलेल्या मंदिराजवळ झाडाच्या आडोशाला उभे राहून एका अज्ञात व्यक्तीने बसवर दगडफेक केली.

त्यात बसमधील एका प्रवासी महिलेला डोक्यात दगड लागून दुखापत झाली आहे. या जखमी महिलेवर गुंजाळवाडी येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून,

बसवाहक सागर लक्ष्मीकांत बनकर व चालक विक्रम अशोक पाटील हे सुखरूप आहे. या घटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे व डोळासणे महामार्गाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहेत.