file photo

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- गेल्याच आठवडयात नामदेव राऊत यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.

भाजपचे कर्जतमधील नेते आणि विद्यमान उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेविका हर्षदा अमृत काळदाते, उषा अक्षय राऊत, किरण पाटील, सतीश समुद्र,

भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामदास हजारे, किरण पाटील आणि रवी पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नामदेव राऊत यांच्यासह अमृत काळदाते, भाजपच्या अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा सरचिटणीस इरफान सय्यद, भाजपचे माजी शहराध्यक्ष रामदास हजारे, बाजार समितीचे संचालक बजरंग कदम,

सामाजिक कार्यकर्ते इन्नूस पठाण, दीपक ननवरे, अरबाज पठाण, साहिल कुरेशी अलिम कुरेशी यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

त्यामुळे कर्जत नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,

कोणत्याही अपेक्षेशिवाय लोकहितासाठी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या या नेत्यांचं स्वागत करुन अजित पवार यांनी त्यांच्याशी संवादही साधला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची कर्जतमधील ताकद वाढण्यासही निश्चितच मदत होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.