अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्याजवळ मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलस्वार रस्ता ओलांडत असतांना समोरून येणारी मालवाहतूक ट्रकच्या (एमपी ०९ एचजी ७५७९) मागील चाका खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात या मालवाहतुक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारसायकलस्वार (एमएच १५ सी ८६५९) वरील चालक हा येवल्याकडे जात असताना मध्यप्रदेश येथील ट्रकवरील चालक आनंद बाबूलाल औसारी याने ट्रक हा भरधाव वेगाने चालवून त्याच्या पुढे चाललेल्या दुचाकी स्वार रस्ता ओलांडताना त्या दुचाकीस्वारास धक्का दिल्याने तो ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला.
या दुर्घटनेनंतर ट्रक चालक हा अपघाताची खबर न देताच निघून गेला.