अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६८ हजार ६७२ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४०४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ७७६ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६३ आणि अँटीजेन चाचणीत २०५ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०२, अकोले ०१, जामखेड ०४, कोपरगाव ०१, नगर ग्रा. ०३, पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहता ०१, संगमनेर १७, श्रीगोंदा ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०४, अकोले ०२, कर्जत ०४, नगर ग्रा.०४, नेवासा २०, पारनेर २३, पाथर्डी ४१, राहाता ११, राहुरी ०७, संगमनेर १३, शेवगाव ०७, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ०९ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २०५ जण बाधित आढळुन आले. मनपा ०२, अकोले १८, जामखेड ११, कर्जत ०३, कोपरगाव ०९, नगर ग्रा. १४, नेवासा ११, पारनेर ६४, पाथर्डी ०९, राहाता १०, राहुरी ०६, संगमनेर ०६, शेवगाव २३, श्रीगोंदा १८ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये अकोले १९, जामखेड ०९, कर्जत २४, कोपरगाव ११, नगर ग्रा. ०३, नेवासा १३, पारनेर ४४, पाथर्डी ६०, राहता ३४, राहुरी ३७, संगमनेर ४८, शेवगाव १३, श्रीगोंदा २७, श्रीरामपूर ३३ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,६८,६७२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२७७६
  • पोर्टलवरील मृत्यू नोंद:५७७३
  • एकूण रूग्ण संख्या:२,७७,२२१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)