अहमदनगर : अशी वेळ कोणत्याही मुलीवर येऊ नये ! नराधमाने प्रेयसीवर अत्याचार केला आणि पळुन गेला, ती गरोदर राहिली आणि भर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :-  अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे प्रेमाचे नाटक करुन एका 15 वर्षीय तरुणीवर तिच्या प्रियकराने अत्याचार केला. त्यात दुसर्‍याच महिन्यात ती गरोदर राहिली.

मात्र, गावात चर्चा व्हायला नको, म्हणून तिच्या घरच्यांनी तिला तब्बल नऊ महिने घरातच ठेवले. मात्र, प्रसूतीची तारीख जवळ आल्याने तिला त्रास होऊ लागला म्हणून घरच्या घरी प्रयत्न केला.

परंतु, पीडित तरुणीला अकोले संगमनेर रस्त्याने नेत असताना तिची संगमनेर बस स्थानकाजवळ प्रसूती झाली. मुलीचे वय फार कमी असल्यामुळे, प्रसूती दरम्यान फार रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला आता नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.

या तरुणीने दिड किलोचे गोंडस बाळास जन्म दिला असून दोघींची परिस्थिती चांगली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणात लक्ष घालुन पीडित तरुणीच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी मारुती भवारी (रा. वारंघुशी, ता. अकोले, जि. अ.नगर) यास बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि, पीडित मुलगी ही इयत्ता 7 वी मध्ये शिकत होती. त्यानंतर तिने शाळा सोडली आणि घरकाम करीत होती. याच दरम्यान, ती गावातील एका दुकानात गेली होती.

तेथे यांची नजरानजर झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी मारुती भवारी याने तिला एका पडक्या घरात नेले आणि तिच्याशी लगट करून करुन तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचार केला.

हे कृत्य केल्यानंतर त्याने पीडित तरुणीस तेथेच सोडले आणि तो निघुन गेला. मुलीच्या घरच्यांनीही आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्याने तोवर गाव सोडले होते. आता गेली 9 महिने या मुलीला यांनी घरातून बाहेर काढले नाही. तिने घरातच कामे करायची आणि समाजापुढे यायचे नाही.

असे हे सर्व दिवस निघुन गेले.आणि जी घटना घडायला नको ती घडून गेली. याबाबत रुग्णालयाने राजूर पोलिसांशी संपर्क केला होता.

त्यानंतर राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तत्काळ मुलीचे जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीस पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहे.