Alert : नवीन घर घेण्याच्या विचारात आहात? तर मग जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नाहीतर पैसा जाईल वाया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Alert : प्रत्येकाला आपले स्वप्नातलं घर खरेदी करावं असे वाटत असते. काहीजण ते खरेदीही करतात. तर काही जणांकडे स्वप्नातलं घर खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे ते गृहकर्ज घेतात. अशातच जर तुम्ही नवीन घर खरेदी करणार असाल तर वेळीच सावध व्हा.

कारण सध्या फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेकांची गृहकर्ज तसेच इतर गोष्टींमुळे लाखो रुपयांची फसवणुक होत आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल काही गोष्टी नक्की जाणून घ्या नाहीतर तुमची खूप मोठी फसवणुक होऊ शकते.

या गोष्टींची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे

  • जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
  • तुम्ही कोणती मालमत्ता खरेदी करणार आहात? ती किती वर्षाची आहे? हे पाहावे.
  • त्या मालमत्तेचा मालक कोण आहे? त्यावर काही वाद सुरू आहेत का? हेदेखील पाहावे.

  • तुम्ही या सर्व महत्त्वाच्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतरच तुम्ही ते घर खरेदी करावे.
  • जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल.

व्याजदरांची तुलना करणे आवश्यक

  • समजा तुम्ही कर्जावर घर घेत असाल तर तुम्हाला कर्जाचा व्याज दर आणि त्याची ईएमआय माहिती असणे खूप गरजेचे आहे.
  • इतकेच नाही तर वेगवेगळ्या बँकांकडून कर्जावर मिळणाऱ्या व्याजदराची तुलना करा.

आजूबाजूच्या वातावरणाची माहिती घेणे गरजेचे

  • ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे नवीन घर खरेदी करणार आहात. त्या ठिकाणाबद्दल जाणून घ्या, तसेच त्या ठिकाणी राहणीमान कसे आहे? हे देखील जाणून घ्या.
  • वीज, पाणी आणि इतर आवश्यक गोष्टींची सुविधा कशी आहे? घर खरेदी केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही ना? हे देखील जाणून घ्या.