Apple Sale : मस्तच.. अवघ्या 38990 रुपयांना खरेदी करा iPhone 13, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apple Offer :काही दिवसांपूर्वी Apple ने iPhone 13 आणि 14 लाँच केला होता. परंतु आता हेच फोन तुम्ही मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही हे फोन क्रोमच्या सेलमधून सहज खरेदी करू शकता. या सेलमधून तुम्ही iPhone 13 अवघ्या 38990 रुपयांना खरेदी करू शकता.

त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. इतकेच नाही तर तुम्ही या सेलमधून वॉच, आयपॅड आणि मॅकबुकवर सगळ्यात मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. याचा लवकरात लवकर लाभ घ्या कारण ही सेल फक्त 2 मे पर्यंत उपलब्ध आहे.

मिळत आहे iPhone 13 आणि 14 वर सगळ्यात मोठी सवलत

क्रोमाच्या एव्हरीथिंग ऍपल मोहिमेतील सर्वात चांगली ऑफर iPhone 13 आणि iPhone 14 वर मिळत आहेत. तुम्हाला हे फोन दोन वर्षांच्या कालावधीसाठी रु. 1,708 आणि रु. 2,125 इतक्या कमी EMI वर घेता येतील.

हे दोन्ही फोन HDFC बँक कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफरसह अनुक्रमे 38,990 आणि 46,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत मिळत आहेत. जर तुम्हाला हे फोन खरेदी करायचे असतील तर ही ऑफर क्रोमा वेबसाइटवर 2 मे पर्यंत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

वॉच, आयपॅड आणि मॅकबुकवर मिळत आहे सगळ्यात मोठी सवलत

या ऑफर्स शिवाय, Apple वापरकर्ते Apple Watch SE केवळ 25,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. Apple वॉचच्या वेगवेगळ्या व्हेरियंटवरही अनेक ऑफर उपलब्ध असून यात संगीत प्रेमींसाठी, Apple Airpods 11,499 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सेलमध्ये उपलब्ध आहेत.

अशातच जर तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करणारा असाल तर Apple MacBook या सेलमध्ये 54,990 रुपयांमध्ये मिळत आहे. इतकेच नाही तर तुम्‍ही HDFC कॅशबॅकसह रु. 26,990 च्‍या सुरुवातीच्या किमतीत आयपॅड खरेदी करू शकता. तुम्ही ते 1,209 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीला, Apple च्या अधिकृत रिटेलर Imagine in India कडून iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर 11,000 रुपयांपर्यंत सवलत देण्यात आली होती. या वेबसाइटवर iPhone 12 ची किंमत फक्त 79,900 रुपये इतकी आहे.

परंतु HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी 7,000 रुपये कमी आणि 4,000 रुपयांच्या अतिरिक्त सूटसह उपलब्ध होते. ही ऑफर फक्त 128GB iPhone 14 वर उपलब्ध होती या फोनची किंमत 68,990 रुपये आहे. मात्र क्रोमा 22,000 रुपयांची आणखी सवलत देत आहे.

जाणून घ्या iPhone 14 ची खासियत

कंपनीचा iPhone 14 2532×1170 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.1-इंच सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येत आहे. याची कमाल ब्राइटनेस 1,200 nits आहे तसेच 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फेस आयडी सेन्सर तसेच फ्रंट कॅमेरासाठी शीर्षस्थानी एक नॉच आहे. हे A15 बायोनिक चिपसेटद्वारे समर्थित असून हा फोन iOS 16 आउट-ऑफ-द-बॉक्सवर चालते.

तसेच फोटोग्राफीसाठी, iPhone 14 मध्ये कंपनीकडून 12-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 120-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूसह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असलेला ड्युअल-कॅमेरा सेटअप देण्यात येत आहे. तर सेल्फीसाठी समोर 12-मेगापिक्सेल लेन्स असून या फोनवर उपलब्ध असणाऱ्या इतर वैशिष्ट्यांमध्ये IP68 रेटिंग, क्रॅश डिटेक्शन, आपत्कालीन SOS, 15W MagSafe चार्जिंग, 20W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 7.5W वायरलेस चार्जिंग यांचा समावेश आहे.