‘तो’ नियम सर्व लोकप्रतिनिधींनाही लावा- नगराध्यक्ष वहाडणे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- जे जिल्हा परिषद कर्मचारी स्वतःच्या आईवडिलांचा सांभाळ करणार नाहीत,अशांच्या वेतनातून 30% रक्कम कपात करून ती संबंधितांच्या आईवडिलांच्या खात्यावर जमा करावी असा ठराव अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सभेत करण्यात आला आहे.

हा निर्णय नक्कीच स्तुत्य आहे,पण हाच नियम सर्वच शासकिय निमशासकीय कर्मचाऱ्यांनाही लावणे गरजेचे आहे असे नगराध्यक्ष वहाडणे यांनी आपले मत व्यक्त केले

पण असा निर्णय करण्याआधी ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतच्या सर्वच निर्वाचित लोकप्रतिनिधींनाही हाच नियम लावून त्यांच्याही वेतन व भत्यामधून काही रक्कम त्यांच्या जन्मदात्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी.

अशा दोषी आढळलेल्या लोकप्रतिनिधींची निवडही रद्द करण्याचा कायदाच करायला हवा.स्वतः सोडून इतरांना मात्र कठोर नियम लावणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही शिस्त लावली पाहिजे,

तरच सर्वजण स्वतःच्या आईवडिलांचा व्यवस्थित सांभाळ करतील असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बोलतांना सांगितले.