Astrology Tips : अशाप्रकारे करा सूर्य देवाला जल अर्पण! तुमची रखडलेली सर्व कामे होतील पूर्ण, गरिबीही होईल दूर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Astrology Tips : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सूर्याची देवता म्हणून पूजा करण्यात येते. सूर्य हा आरोग्य, पिता आणि आत्मा यांचा कारक मानण्यात येतो. अनेकजण सकाळी सूर्य देवाला जल अर्पण करतात. तसेच जल अर्पण करण्याचेही काही महत्त्वाचे नियम आहेत.

जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर तुम्हाला त्याचे शुभ फल प्राप्त होते. इतकेच नाही तर माणसाच्या आयुष्यात सूर्याचे मोठे योगदान आहे. जोतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असल्यास त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळत राहते.

खरं तर ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य देवाच्या पूजेला खूप महत्त्व देण्यात आले आहे. समजा तुम्हाला नीट पूजा करता येत नसेल तर तुम्ही फक्त सूर्य देवाला जल अर्पण करू शकता. ते देखील पुरेसे आहे. तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व त्रासांपासून सूर्य उपासनेने मुक्ती मिळवू शकता. ज्योतिषशास्त्रज्ञानाच्या म्हणण्यानुसार सूर्य देवाला योग्य प्रकारे जल अर्पण केले तर सगळ्यात मोठ्या गरीब व्यक्तीलाही राजयोग प्राप्त होऊ शकतो.

जाणून घ्या फायदे

  • नेहमी सूर्याला जल हे तांब्याच्या भांड्यातूनच अर्पण करावे.
  • इतकेच नाही तर सूर्याला जल अर्पण करण्याची एक निश्चित वेळ असून सकाळी पाणी अर्पण करणे फायद्याचे आहे.
  • तसेच जल अर्पण केल्यानंतर ओम आदित्य नमः किंवा ओम घ्रिण सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा.
  • तुम्ही जर दररोज सूर्याला जल अर्पण केले तर तुम्हाला आत्मशुद्धी आणि शक्ती प्राप्त होते तसेच आरोग्याचा लाभ होतो.
  • तसेच तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतात.