Bajaj Pulsar N160 Bike : दमदार मायलेज असणारी बाईक स्वस्तात खरेदी करता येणार! कुठे मिळत आहे संधी पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajaj Pulsar N160 Bike : बजाज या वाहन निर्मात्या कंपनीने ग्राहकांच्या मनावर राज्य निर्माण केले आहे. त्यात कंपनीची पल्सर ही बाईक तरुणाईच्या गळ्यातली ताईत बनली आहे. अशातच कंपनीने आपल्या चाहत्यांसाठी भारतीय बाजारात बजाज पल्सर एन 160 ही शक्तिशाली बाईक लौंच केली आहे.

तेव्हापासून या बाईकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या नवीन ग्राहकांसाठी कंपनीने आपल्या नवीन बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स दिली आहेत. जी तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.

नवीन बजाज पल्सर N160 बाईक

बजाजची नवीन पल्सर डायग्नोस्टिक सिस्टम रिअल टाइममध्ये उत्सर्जन पातळीचा मागोवा घेते. समजा कोणतीही अडचण आली तर इंडिकेटरद्वारे डॅशबोर्डवर माहिती ग्राहकांना मिळते. तसेच बाईकचे E20 इंधन सुसंगत बनवले आहे. म्हणजेच या बाईकमध्ये पेट्रोलसोबत 20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधनही काम करू शकेल.

कसे असणार इंजिन?

कंपनीकडून या बाइकमध्ये दमदार इंजिन देण्यात आले आहे. यात 164.82 सीसी सिंगल सिलेंडर एअर कूल इंजिन असून हे 5 स्पीड गिअरबॉक्ससह सादर केले आहे. कंपनीकडून त्याच्या ट्विन डीआरएलसह सिंगल-पॉड प्रोजेक्टर स्टाइल हेडलाइट कायम ठेवण्यात आला आहे.

पहा पल्सर N160 ची खास फीचर्स

तुम्हाला कंपनीच्या या बाईकमध्ये सर्वात उत्तम फीचर्स पाहायला मिळू शकतील. तुम्हाला यात 17 इंची अलॉय व्हील्स मिळेल. तुम्हाला ही बाईक ब्रुकलिन ब्लॅक, रेसिंग रेड आणि कॅरिबियन ब्लू अशा तीन कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. तसेच या बाईकच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यात सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जर, डिस्टन्स-टू-इम्प्टी मीटर यासारखे भन्नाट फीचर्स दिले जात आहेत.

किती असेल किंमत?

किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 1.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम बाईक घेण्याच्या विचारात असल्यास बजाजची ही बाईक तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.