एसबीआयची उत्तम योजना ! एकदा गुंतवणूक करून दरमहा करा उत्तम कमाई !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Deposit Scheme : गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही उत्तम पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता.

तुमच्या माहितीसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवते. यावेळीही या सरकारी क्षेत्रातील बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अशीच खास योजना आणली आहे. ज्यामध्ये फक्त एकदाच डिपॉझिट केल्यावर तुम्हाला दर महिन्याला चांगली कमाई होईल.

ही SBI वार्षिकी ठेव योजना आहे. जी खूप लोकप्रिय आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळते. यामध्ये कोणतीही व्यक्ती तीन वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंत नियमितपणे कमाई करू शकते.

गुंतवणूक केव्हा करता येईल?

कोणताही गुंतवणूकदार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या एसबीआय Annuity डिपॉझिट स्कीममध्ये ठेवू शकतो. गुंतवणूकदारांना 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत जमा करण्याची कमाल मर्यादा नाही. परंतु निवडलेल्या कालावधीसाठी तुम्हाला किमान हजार रुपये गुंतवावे लागतील.

जर तुम्हाला बचत खात्यातून अधिक परतावा मिळवायचा असेल तर ही योजना तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. यामध्ये केलेल्या ठेवीवर तेवढेच व्याज मिळते, जे एफडीच्या ठेवीवर म्हणजेच मुदत ठेवीवर मिळते. या योजनेत जेंव्हा खाते उघडले जाते, त्यावेळी व्याजदर कायम राहतो. हाच दर संपूर्ण कालावधीसाठी राहील. जर तुम्हाला दरमहा किमान 12 हजार रुपये कमवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एकाच वेळी किमान दहा लाख रुपये गुंतवावे लागतील.

कर्जाची सुविधा उपलब्ध

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या Annuity डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला कर्जाची म्हणजेच ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळू शकते. या ओव्हरड्राफ्ट खात्यातील पैशातून 75 टक्के रक्कम घेतली जाऊ शकते.