Best SmartPhone 2022: 20 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा ‘ह्या’ पावरफुल स्मार्टफोन्स! फीचर्स पाहून व्हाल तुम्ही थक्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best SmartPhone 2022:  नवीन वर्षांपूर्वी तुम्ही देखील तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी एक नवीन स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही जबरदस्त स्मार्टफोनची माहिती देणार आहोत जे तुम्ही 20 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहे.

युजर्सला या स्मार्टफोनमध्ये एका पेक्षा एक जबरदस्त फीचर्स देखील मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया या जबरदस्त स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्सबद्दल संपूर्ण माहिती.

Vivo T1 5G 

Vivo च्या या फोनमध्ये Snapdragon 695 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 6.58 इंच स्क्रीनवरून फुल एचडी + डिस्प्ले उपलब्ध आहे. या फोनमध्ये 120 HZ चा रिफ्रेश दर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50 MP मेन रियर कॅमेरा, 2 MP दुय्यम कॅमेरा आणि 2 MP तिसरा कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर यात 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh ची बॅटरी आहे. फोनच्या 4 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 15,990 रुपये, 6 जीबी रॅम मॉडेलची किंमत 16,990 रुपये आणि 8 जीबी रॅम मॉडेलची किंमत 19,990 रुपये आहे.

 

Xiaomi Redmi Note 11T 5G 

Xiaomi च्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर इन्स्टॉल आहे. फोनमध्ये 6.6-इंच स्क्रीनसह IPS LCD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 90 HZ चा रिफ्रेश दर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50 MP मुख्य रिअर कॅमेरा आणि 8 MP दुय्यम कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर यात 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh ची बॅटरी आहे. फोनच्या 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 16,999 रुपये आणि 8 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे.

realme 9 5G 

या फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर इन्स्टॉल आहे. फोनमधील 6.5 इंच स्क्रीनवर फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यात 48 MP मेन रियर कॅमेरा, 2 MP डेप्थ आणि 2 MP मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय 16 एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000 mAh ची बॅटरी आहे. हा फोन 4 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. 6 जीबी रॅम असलेल्या मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे.

Samsung Galaxy F23 5G 

या सॅमसंग फोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर बसवला आहे. फोनमध्ये 6.6-इंचाच्या स्क्रीनवरून फुल एचडी + डिस्प्ले उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50 MP मुख्य रिअर कॅमेरा, 8 MP अल्ट्रा वाइड आणि 2 MP तिसरा कॅमेरा आहे. याशिवाय 8 एमपी फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. यात 5000 mAh ची बॅटरी आहे. 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला फोन फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.

OnePlus Nord CE 2 Lite 

या फोनमध्ये Snapdragon 695 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 6.59 इंच स्क्रीनवरून फुल एचडी + डिस्प्ले उपलब्ध आहे. फोनमध्ये 120 HZ चा रिफ्रेश दर देखील देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यात 64 MP चा मुख्य रियर कॅमेरा आहे, याशिवाय 2 MP चे इतर 2 कॅमेरे आहेत. याशिवाय यात 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh ची बॅटरी आहे. त्याच्या 6 GB रॅम आणि 128 GB मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे.

Moto G62 5G 

या Motorola फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आहे. फोनमध्ये 6.55 इंच स्क्रीनवरून फुल एचडी + डिस्प्ले उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यात 50 MP मुख्य रिअर कॅमेरा आणि 8 MP दुसरा कॅमेरा आणि 2 MP तिसरा कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर यात 16 MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh ची बॅटरी आहे. फोनच्या 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची फ्लिपकार्टवर किंमत 15,999 रुपये आहे आणि 8 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे.

हे पण वाचा :-   New Year 2023 :  धक्कादायक ! मार्केटमधून अचानक बंद होणार ‘ह्या’ लोकप्रिय 17 कार्स ; पहा संपूर्ण लिस्ट