Best Summer Destinations In India : बजेटचे नो टेन्शन! या सर्वोत्तम पर्यटन स्थळांना कुटुंबासोबत द्या भेट, सहल होईल आनंददायी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Summer Destinations In India : सध्या उन्हाळा सुरु आहे त्यामुळे शाळांना सुट्टी आहे. शाळांना सुट्टी असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. मात्र कमी बजेटमध्ये अनेकांना फिरायला जायचे असते. कमी बजेटमध्ये अनेकांना चांगल्या पर्यटन स्थळांना भेट देईची असते.

मात्र भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांविषयी अनेकांना माहिती नसते. त्यामुळे अनेकजण जवळची पर्यटन स्थळे निवडत असतात. मात्र अशी पर्यटन स्थळे निवडणे अनेकांना त्रासदायक ठरत असते. कारण अशा ठिकाणी उष्णता जास्त असते.

उन्हाळ्यामध्ये नेहमी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावे. भारतात अनेक प्रसिद्ध हिल स्टेशन आहेत ज्या ठिकाणी तुम्ही थंड हवेचा आनंद घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

भारतातील खालील प्रसिद्ध पर्यटन स्थळांना तुम्ही देखील तुमच्या बजेटमध्ये कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

बजेटमध्ये भेट देण्याची ठिकाणे

अलेप्पी

तुम्हालाही उन्हाळ्यामध्ये थंड हवेचा आनंद घेईचा असेल तर तुम्ही अलेप्पी या भारतातील सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. अलेप्पी हे एक दक्षिण भारतातील सुंदर पर्यटन स्थळ आहे. अलेप्पीमध्ये हिरवळ, नैसर्गिक सौंदर्य, बॅकवॉटर, बोट मुक्काम, कॅम्पिंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता.

तुम्ही या ठिकाणी मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत या ठिकाणाला भेट देऊ शकता. अलेप्पी ला भेट देण्यासाठी प्रति व्यक्ती तुम्हाला 8 ते 10 हजार खर्च येऊ शकतो. त्यामुळे कमी बजेटमधील हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे.

गोवा

गोव्याला दारावसरही लाखो पर्यटक भेट देत असतात. या ठिकाणी समुद्र किनारा आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी अनेकजण गोव्याला भेट देत असतात. उत्कृष्ट आर्किटेक्चर, किल्ले, स्थानिक बाजारपेठ, वॉटर फॉल्स, समुद्रकिनारे आणि आनंददायी वातावरणासह गोव्याच्या सहलीसाठी तुम्ही प्रति व्यक्ती 7 ते 8 हजारांच्या बजेटमध्ये जाऊ शकता.

ऋषिकेश

प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी तुम्ही स्वस्त आणि मस्त ऋषिकेश या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता. उत्तराखंडमध्ये उन्हाळ्यात थंड वातावरण असते. या ठिकाणी तुम्ही गंगेच्या काठावर बसून नेत्रदीपक आणि आरामदायी सूर्यास्त पाहू शकता. ऋषिकेशच्या सुंदर दऱ्या, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, रोमांचक उपक्रम या ठिकाणी अनुभवू शकता. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला 5 ते 7 हजार खर्च येऊ शकतो.

दार्जिलिंग

निसर्गाच्या प्रतिबिंबात हिंडायचे असेल तर दार्जिलिंग हे खूप चांगले सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी तुम्हाला हिरवेगार चहाचे मळे पाहायला मिळतील. तसेच इतर पर्यटन स्थळांचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. या ठिकाणी जाण्यसाठी तुम्हाला सुमारे 8 ते 10 हजार खर्च येईल.