भाजपवाल्यांनो सावधान! उद्या दे स्वतःला नरेंद्र मोदी समजतील अन्…; उद्धव ठकरेंची शिंदेंवर बोचरी टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी पहिल्यांदा मुलाखत दिली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रदर्शित झाला. त्यमध्ये उद्धव ठाकरेंनी बंड केलेल्यांवर सडकून टीका केली. आज सामनामधील मुलाखतीच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारित झाला आहे.

प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान… उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, असा भाजपला सल्ला देत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

मी मुख्यमंत्री झालो तर प्रॉब्लेम काय तुम्हाला? म्हणून काय तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. मी तेव्हा म्हणालो होतो, संयम ठेवा. आधी भाजपबरोबर सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतोय असं म्हणायचे. भाजप नको असे सांगणारे हेच लोक होते. गावागावात भाजप शिवसेनेला काम करू देत नाही. भाजप शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.