BH Number Plate : स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी ! जाणून घ्या ‘हा’ नियम, रोड टॅक्सही कमी द्यावा लागेल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BH Number Plate : जवळपास प्रत्येकाकडे स्वतःची कार (Car) असते. कारच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशातच तुम्हाला स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी आहे.

त्याचबरोबर या कार मालकाकडे एक सीरीज नंबर (Series number) असेल तर त्याला एका राज्यातून (State) दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी कोणाचीच परवानगी घेण्याची गरज पडत नाही.

BH नंबर प्लेट म्हणजे काय?

नंबर प्लेट्सच्या या नवीन सीरिजला भारत म्हणजेच BH सीरीज (BH Series) असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही नंबर प्लेट असलेली कार देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात फिरू शकते.

नवीन ठिकाणी हस्तांतरण किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पुनर्नोंदणी किंवा एनओसीची (NOC)  आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही अशा नोकरीत असाल जिथे वारंवार बदल्या होत असतील, तर BH नोंदणी (BH registration) असलेली नंबर प्लेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

यासाठी कोण अर्ज करू शकतो

1. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी
2. BHEL, BEL, ONGC, BSNL, आणि NHPC सह PSU कर्मचारी
3. लष्कर आणि संरक्षण दल कर्मचारी
4. खाजगी क्षेत्रातील कंपनी किंवा संस्थेचे कर्मचारी, ज्यांची अनेकदा बदली केली जाते.
5. चार राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेली कंपनी

हा नियम जाणून घ्या

  • BH नंबर प्लेट फक्त नवीन खाजगी आणि बिगर वाहतूक वाहनांसाठी उपलब्ध आहे.
  • सरकारी कर्मचारी त्यांचे ओळखपत्र देऊ शकतात. खाजगी कर्मचाऱ्याला फॉर्म 60 भरावा लागेल आणि तो डीलरला द्यावा लागेल.
  • यामध्ये तुम्हाला दर दोन वर्षांनी रोड टॅक्स पुन्हा जमा करावा लागेल.