मंदिर हे मन शुद्धीचे ठिकाण -शिवाजी कर्डिले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  तपोवन रोड बुर्‍हाणनगर येथील संत वामनभाऊ नगर येथे विठ्ठल रुक्मिणी व संत वामनभाऊ मंदिराचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते झाले.

यावेळी बुर्‍हाणनगर गावचे सरपंच रावसाहेब कर्डिले, उपसरपंच जालिंदर जाधव, ग्रामपंचायत सदस्य रवि कर्डिले, दत्ताभाऊ तापकिरे, जयहिंद सैनिक सेवा संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे,

राहुल सांगळे आदींसह वामनभाऊ नगर परिसरातील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होते. शिवाजी कर्डिले म्हणाले की, मंदिर हे मन शुद्धीचे ठिकाण आहे. दररोजच्या धावपळीच्या जीवनात मंदिरात आल्याने मनाला प्रसन्नता व जगण्याची नवी उमेद मिळत असते.

देवाच्या अराधनेने आत्मबळ निर्माण होते. वामनभाऊ नगर येथे उभे राहत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सहकार्य असणार असल्याचे सांगून, या भव्य मंदिराने या भागातील सुंदरता वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मा.संपादक कृपया प्रसिध्दीसाठी तपोवन रोड बुर्‍हाणनगर येथील संत वामनभाऊ नगर

येथे विठ्ठल रुक्मिणी व संत वामनभाऊ मंदिराचे भूमिपूजन माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते झाले. यावेळी बुर्‍हाणनगर गावचे सरपंच रावसाहेब कर्डिले, उपसरपंच जालिंदर जाधव, ग्रामपंचायत सदस्य रवि कर्डिले, दत्ताभाऊ तापकिरे, जयहिंद सैनिक सेवा संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पालवे, राहुल सांगळे आदिंसह नागरिक.

अहमदनगर लाईव्ह 24