मोठी बातमी : राज्यभरात पोलिसांकडे तक्रारी दाखल,नारायण राणे यांनी आता केलीय ‘ही’ मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली.

राणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना रात्री उशीरा जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केल्यानंतर राणेंची सुटका झाली.

जामीन मिळाल्यानंतर राणे पुन्हा एकदा जन आशिर्वाद यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेले एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर राजकीय वातावरण तापलं आहे.

नाशिक, पुणे, महाड व ठाणे या चार ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राणेंविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.त्यानंतर समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली होती.

राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले होते.