Big News ‘त्या’ शिक्षकांना ऑगस्टपासून वेतन मिळणार नाही..? संचालकांनी दिले ‘हे’ आदेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big News : राज्यभर गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरप्रकारात अपात्र ठरवण्यात आलेल्या ५७६ शिक्षकांचे ऑगस्टपासूनचे वेतन न देण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील यांनी दिले आहेत.

संबंधितांचे नाव वेतन देयकातून वगळून ऑगस्टचे वेतन देयक तयार करून अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान देण्याचे पाटील यांनी आदेश दिले आहेत.त्यामुळे आता या प्रकरणीसंबंधीत असलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

सन२०१९ मध्ये झालेल्या टीईटी परीकक्षेत झालेल्या गैरप्रकारातील समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे आणि कारवाई निश्चित करण्यासंदर्भात परीक्षा परिषदेच्या आयुक्तांकडून प्राथमिक शिक्षण संचालनालयाला उमेदवारांची यादी देण्यात आली.

तसेच या यादीतील परीक्षार्थी जिल्हा परिषद किंवा खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळेत कार्यरत असल्यास आणि या सेवेच्या अनुषंगाने त्यांना शालार्थ आयडी प्रदान केलेला असल्यास शिक्षण संचालकांनी त्यांच्या स्तरावरून पुढील आदेशापर्यंत शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेच्या यादीतील ७ हजार ८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांचे आधारकार्ड आणि शालार्थ आयडीनुसार मॅपिंग करण्यात आले असता

अपात्र उमेदवारांपैकी ५७६ उमेदवार जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक किंवा सहशिक्षक कार्यरत आहेत

आणि वेतन अनुदान घेत असल्याचे निदर्शनास आले.या पार्श्वभूमीवर संबंधित ५७६ उमेदवारांचे शालार्थ आयडी गोठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.