Maharashtra : ब्रेकिंग ! नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई; कोर्टाच्या आदेशानंतर हातोडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील आधीश बंगल्यावर हातोडा चालवण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशनानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईचे आदेश दिले आहेत. बेकायदा बांधकाम पाडण्याचे काम

जुहू येथील आदेश बंगल्याचे बेकायदा बांधकाम पाडण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा धक्का बसला आहे.

उच्च न्यायालयाने राणेंच्या बंगल्यावरील बांधकाम नियमित करण्याची याचिका फेटाळून लावत मुंबई महापालिकेला अतिरिक्त बेकायदा बांधकाम पाडून पुढील २ आठवड्यांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

नारायण राणे यांना 10 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार देत राणेंची याचिका फेटाळून लावली. यासोबतच राणेंना बंगल्यातील बेकायदा बांधकाम स्वतःहून पाडण्यासाठी २ महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

कोर्टाच्या आदेशनानंतर नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई करण्यात येत आहे. नारायण राणेंना मोठा झटका मानला जात आहे. महापालिकेकडून ही कारवाई करण्यात येत आहे.