BSNL Recharge Plan : ‘या’ कंपनीच्या ग्राहकांना जोरदार दणका, प्लॅन केले महाग

BSNL Recharge Plan : BSNL ने बऱ्याचदा आपल्या यूजर्ससाठी (Users) चांगले प्लॅन (Plan) लाँच केले आहेत. परंतु, आता BSNL ने यूजर्सला मोठा झटका दिला आहे. (BSNL Recharge Plan)

कंपनीने आपल्या काही प्रीपेड प्लान्सच्या (Pre-paid Plan) किंमती न वाढवता त्याची वैधता (Validity) कमी केली आहे. वैधता कमी करण्यात आल्याने डेली यूजेस चार्जमध्ये 65 पैसे ते 1.60 रुपयाची वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गेल्या आठवड्यात, कंपनीने 99 रुपये, 118 रुपये आणि 319 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचे फायदे कमी केले आहेत. ब्रँडने 999 रुपयांच्या आणि 1499 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह असेच केले आहे. BSNL ने 1498 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत वाढवली आहे. आता हा प्लॅन 1515 रुपयांचा आहे.

बीएसएनएलचा 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलचा 999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन पूर्वी (999 Recharge Plan) 240 दिवसांच्या वैधतेसह यायचा. 1 जुलै 2022 नंतर कंपनीने प्लॅनची ​​वैधता 200 दिवसांपर्यंत कमी केली आहे. म्हणजेच या प्लॅनचे सरासरी मूल्य 4.16 रुपयांवरून 4.99 रुपये झाले आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना फक्त व्हॉईस कॉलिंगचे फायदे मिळतात. यामध्ये एसएमएस आणि डेटाचे फायदे मिळणार नाहीत. यासोबतच यूजर्सना दोन महिन्यांसाठी पर्सनल रिंग बॅक ट्यून देखील मिळेल.

BSNL चा 1499 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबत दररोज 100एसएमएस आणि 24 जीबी डेटा मिळतो. कंपनीने यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. ब्रँडने प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांवरून 336 दिवसांवर आणली आहे.

म्हणजेच या प्लॅनचा दैनंदिन खर्च 4.10 रुपयांवरून 4.46 रुपये झाला आहे. (1499 Recharge Plan) यामध्ये तुम्हाला कोणताही मोठा बदल दिसणार नाही, परंतु प्लॅनची ​​वैधता कमी करणे ही अप्रत्यक्ष किंमत वाढ आहे. कंपनीने गेल्या वर्षी आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या नाहीत, मात्र आता हळूहळू वाढवल्या जात आहेत.