Business Idea : शेतकऱ्यांनो.. ‘या’ वनस्पतीची लागवड करून व्हा करोडपती, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. अनेकजण करत असलेली नोकरी सोडून व्यवसाय करू लागले आहे. तसेच ते या व्यवसायातून बक्कळ पैसाही कमवत आहेत.

इतकेच नाही तर आता जर तुमच्याकडे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता सरकारी मदत घेऊन हा व्यवसाय सुरु करू शकता. सरकार तुम्हाला मुद्रा योजनेतून कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे.

देशातील सागवानाच्या एकूण वापराच्या तुलनेत फक्त 5% लाकूड उपलब्ध असून शिवाय त्याची साल आणि पाने औषधी बनवण्यासाठी वापरण्यात येतात. प्लायवूड, जहाजे, रेल्वेचे डबे तसेच इतर फर्निचर बनवण्यासाठी सागवानाच्या लाकडाचा वापर करण्यात येतो.

अशी करा शेती

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सागवान रोपे वाढवण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या मातीची गरज लागत नाही. सागवान रोपे ही चिकणमाती जमिनीत सहज येते. परंतु पाणी साचत असणाऱ्या ठिकाणी सागाची लागवड टाळावी. पाणी साचत असल्याने सागवान झाडांवर रोग होऊन ते सुकले जाते. तसेच सागवानाच्या झाडांची सामान्य तापमानात चांगली वाढ होते. सहसा त्यांची 15 ते 40 अंश तापमानात चांगली वाढ होते. सागाची लागवड मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी करावी.

इतका येईल खर्च

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सागवान रोपे थोडी महाग असतात. समजा कोणी बियाण्यांपासून रोपे तयार करून त्यांची लागवड केल्यास त्या व्यक्तीला जास्त पैसे खर्च करावे लागत नाही.मात्र अनेक शेतकरी हे करू शकत नाही.

याचे कारण म्हणजे शेतात लावण्यासाठी सागवानाचे रोप किमान 18 महिने जुने असणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकरी रोपवाटिकांमधून रोपे विकत घेतात आणि त्यांची लागवड करत असतात. सागवानाची चांगले रोप एकूण 60 रुपयांना मिळते. एका एकर जमिनीत एकूण 400 झाडांची लागवड केली जाते.

त्यामुळे तुम्हाला 24 हजार रुपये हे रोपे लावण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत. रोप लावण्यासाठी जमीन तयार करणे तसेच खड्डे बुजवणे यामुळे हा खर्च होतो. तसेच ही रोपे लावल्यानंतर त्याची खुरपणी करावी लागते. एका अंदाजानुसार पहिल्या वर्षी एक एकर सागवान लागवडीसाठी सुमारे 60 हजार रुपये खर्च येतो.