Business Idea : केवळ 8 हजार रुपये गुंतवून तुम्हीही होऊ शकता ‘या’ व्यवसायातून महिन्याभरातच लखपती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : बरेच जण असे असतात की त्यांना करत असलेल्या नोकरीत (Job) तिळमात्र आवड (Interest) नसते. परंतु, कुटुंबावरील आर्थिक संकटामुळे (Economic crisis) आणि केवळ उदरनिर्वाह (Subsistence) म्हणून ते नोकरी करत असतात.

नोकरीला कंटाळलेल्या व्यक्तींसाठी हा व्यवसाय (Business) एक उत्तम पर्याय आहे. असेही काही व्यवसाय आहेत जे तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीत (Low investment) करु शकता.

देशाच्या महानगरांमध्ये अनेक विद्यार्थी आणि नोकरदार लोक राहतात, ज्यांना स्वतःहून स्वयंपाक करायला आवडत नाही. अशा परिस्थितीत या लोकांना टिफिन सेवा देऊन तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता.

मात्र, टिफिनचा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रसिद्धी आणि मार्केटिंग चांगले करावे लागेल. तुम्हाला तुमच्या टिफिन सेवेबद्दल जास्तीत जास्त लोकांना सांगावे लागेल.

प्रसिद्धी वाढल्यानंतर लोक तुमची टिफिन सेवा अधिक प्रमाणात वापरतील. यामुळे तुमचा टिफिन मोठ्या प्रमाणात विकला जाईल आणि तुम्हाला या व्यवसायातून दर महिन्याला बंपर कमाई करता येईल.

याशिवाय, तुम्ही तुमच्या टिफिन सेवेची पोहोच वाढवण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करू शकता. देशात असे अनेक लोक आहेत जे टिफिन सेवेच्या व्यवसायातून दरमहा 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमावत आहेत.