Business Idea : मस्तच… कोणताही कार्यक्रम असो ‘या’ सुपरहिट व्यवसायामुळे तुम्ही करू शकाल खूप मोठी कमाई, कसे ते पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करू लागले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायात अनेकांना यशही मिळत आहे. यापैकीच एक व्यवसाय म्हणजे कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय होय. जर तुम्ही हा व्यवसाय सुरु केला तर तुम्हीसुद्धा महिन्याला हजारो रुपयांची कमाई करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यसायासाठी तुम्हाला केंद्र सरकार कोणत्याही हमीशिवाय मुद्रा योजनेअंतर्गत एकूण 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे. 12 महिने हा व्यवसाय चालतो, त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरु केला तर याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकेल.

सध्याच्या काळात कार्ड प्रिंटिंगचे खूप फायदे आहेत. लग्नपत्रिकेपासून ते वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत लोक कार्ड छापतात. अशातच आता सेवानिवृत्तीनंतरही लोकांना कार्ड छापण्यात येत आहे. तसेच इतरही अशा खूप संधी आहेत. त्यामुळे या व्यवसायाचा योग्य विचार करून पूर्ण नियोजन केले तर त्याची व्याप्तीही खूप चांगली आहे.

आकर्षक बनवावे कार्ड

कार्ड सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी त्याचे डिझायनिंग असावे. आता प्रत्येकजण कार्ड मुद्रित करू शकतो, मात्र प्रत्येकाला डिझाइन चांगले करता येत नाही. सध्या इंटरनेटवर अनेक कार्ड डिझाइन्स उपलब्ध असल्या तरी तुम्ही प्रिंटिंगच्या व्यवसायात उतरत असल्यास तुमच्यासाठी स्वतःचे काहीतरी वेगळे करणे खूप गरजेचे आहे.

कार्डचे डिझाईन प्रत्येक वर्षी आणि विविध लग्नसोहळ्या आणि कार्यक्रमांनुसार बदलत असते. त्यामुळे स्वत:ला अपडेट ठेवावे, नवीनतम डिझाईन्स जाणून घेणे तसेच ट्रेंड फॉलो करणे आणि ते उत्तम प्रकारे अंमलात आणणे हे या क्षेत्रातील एक महत्त्वाचे काम आहे. जे खूप चांगल्या पद्धतीने करावे.

तुम्ही आता खूप कमी पैसे गुंतवून कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. साधारणपणे एका कार्डची किंमत 10 रुपयांपर्यंत आहे. परंतु कार्ड्सचा दर्जा आणि डिझाइन जसजसे चांगले होते. तशी त्याची किंमत वाढतच जाते.

प्रत्येक लग्नासाठी कमीत कमी 500 ते 1000 कार्ड छापण्यात येतात. त्यामुळे जर तुम्ही 10 रुपयांमध्ये कार्ड प्रिंट करत असल्यास त्याची संपूर्ण किंमत काढूनही तुम्हाला आता 3 ते 5 रुपयांपर्यंत सहज बचत करता येते. जर कार्ड महाग झाल्यास ही बचत 1 कार्डमध्ये 10 ते 15 रुपयांपर्यंत असेल. त्यामुळे लग्नाच्या या सीझनपासून तुम्हाला या व्यवसायातून मोठी कमाई करता येईल.