Business Idea : सुरु करा आरोग्याशी निगडित व्यवसाय, होईल कमी गुंतवणूकीत बंपर कमाई, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : अनेकजण नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार आता कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल.

तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर तुम्हाला सरकार मदत करेल. जर तुम्ही सरकारी मदत घेऊन आरोग्याशी संबंधित हा व्यवसाय सुरु केला तर यातून तुम्हाला बंपर कमाई करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या व्यवसायासाठी कोणत्याही ट्रेनिंगची गरज पडणार नाही.

सरकार आता लोकांना स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहित करत असून तुम्ही नोकरी सोडली असली तरी हा व्यवसाय सुरू करू शकता. सध्या वेफर्सना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजपर्यंत या क्षेत्रात खूप मोठ्या कंपन्या आल्या नसल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेला सामोरे जावे लागू शकणार नाही.

अशी करा सुरुवात

यासाठी, सर्वात अगोदर तुम्हाला कच्च्या मालाची आवश्यकता गरज पडणार आहे. तुमच्याकडे मसाले असतीलच मीठ, खाद्यतेल आवश्यक असणार आहे. वेफर्स बनवण्यासाठीही मशिन्स घ्यावी लागणार आहेत. फळे किंवा भाज्या सोलून उकळण्यासाठी आणि त्यांचे पातळ काप करण्यासाठी मशीनची गरज पडते.

इतकेच नाही तर तळण्यासाठी आणि मिसळण्यासाठी मशीनची गरज असते. पाऊच छापण्यासाठी मशीनही लावावी लागत आहे. जर तुम्हाला हे मशीन विकत घ्यायचे नसल्यास तुम्ही ते भाड्याने घेऊ शकता किंवा बाहेर प्रिंट करून घेऊ शकता. जर तुम्ही मेहनत घेतली तर तुमचा व्यवसाय वाढू शकतो.

होईल मोठा फायदा

जर तुम्ही 100 किलो उत्पादन तयार केल्यास तुम्हाला कच्चा माल, मसाले आणि खाद्यतेल तसेच इतर खर्चासह सुमारे 5,000 ते 7,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. काही वेळेस या भाज्या किंवा इतर फळांची किंमत थोडी जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे बजेट आणखी वाढू शकते. बाजारात वेफर्सची किंमत 150 रुपये किलोपर्यंत असून 100 किलोची किंमत 15,000 रुपयांपर्यंत उपलब्ध असणार आहे. यातून 7,000 रुपये वजा केले तर तुमचे 8,000 रुपये वाचतील.

ढोबळ अंदाजानुसार जर तुम्ही दिवसाला 40 किलो ते 60 किलो वेफर्स बनवले तर सर्व खर्च जाऊन तुम्हाला खूप मोठा नफा मिळेल. त्यामुळे एका दिवसात 2800 ते 6,000 रुपये सहज कमावता येऊ शकतात. अशा प्रकारे आता तुमची प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांची कमाई होईल. सध्या मुंबईत अनेकजण भाजी किंवा वेफर्सचा व्यवसाय करत आहेत.