Business Idea: ‘हा’ फायदेशीर व्यवसाय करा सुरु अन् 10-15 वर्षे कमवा लाखो रुपये ! वाचा सविस्तर माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea:  या महागाईच्या काळात तुम्ही देखील नोकरीसह अतिरिक्त उत्पन्न कमवण्याचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एक जबरदस्त बिझनेस आयडिया देणार आहोत, या आयडियाच्या मदतीने तुम्ही दरमहा चांगली कमाई देखील करू शकणार आहे. 

आम्ही तुम्हाला सांगतो यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. या व्यवसायात एकदा गुंतवणूक करून, तुम्ही 10 ते 15 वर्षांसाठी सहजपणे अतिरिक्त कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला मदत करेल. चला जाणून घेऊया काय आहे हा व्यवसाय आणि किती फायदा होऊ शकतो.

टेंट हाऊस व्यवसाय

टेंट हाऊस असे या व्यवसायाचे नाव आहे. हा असा व्यवसाय आहे, जो गावापासून शहरापर्यंत कुठेही सुरू करता येतो. यामध्ये कोणतेही नुकसान नाही. याचा उपयोग विवाहसोहळे, सण, धार्मिक समारंभ, राजकीय आणि इतर अधिकृत कार्यात केला जातो. म्हणूनच हा व्यवसाय खूप फायदेशीर आहे.

खर्च किती येईल 

स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने टेंट हाऊस  व्यवसायाचा अहवाल तयार केला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) प्रकल्प अहवालानुसार, टेंट हाऊस  व्यवसाय 4 लाख रुपयांपासून सुरू होईल. यामध्ये 500 चौरस फूट इमारतीच्या शेडसाठी 100000 रुपये खर्च केले जाणार आहेत आणि चांदणी, भांडी, टेबल, खुर्ची, पंखा, दोरी आणि बांबू इत्यादी खरेदीसाठी 300,000 रुपये खर्च केले जातील.

किती कमावता येईल

KVIC च्या अहवालात असे म्हटले आहे की टेंट हाऊसचा व्यवसाय वार्षिक 150000 रुपयांपर्यंत कमवू शकतो. अहवालानुसार इमारतीच्या गुंतवणुकीचे रुपांतर भाड्यात व्हायला हवे, म्हणजे सामान ठेवण्यासाठी शेड बांधण्याऐवजी इमारत भाड्याने घेतली तर एकूण प्रकल्प खर्च कमी होईल. तुमचा नफा वाढेल.

हे पण वाचा :-  Government Scheme : ‘या’ लोकांसाठी खुशखबर ! आता खात्यात जमा होणार 36000; जाणून कसा होणार लाभ