Car Dealership Cheating : ग्राहकांची अशी होते कार डीलरशिपवर फसवणूक, लक्ष द्या नाहीतर तुमचे जातील हजारो रुपये वाया

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Car Dealership Cheating : भारतीय बाजारात सध्या कारची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेता सर्वच कंपन्या आपल्या नवनवीन आणि शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. अशातच आता पुढच्या महिन्यापासून ग्राहकांना कार खरेदी साठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

कारण कार उत्पादक कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण त्यांची कार डीलरशिपवर मोठी फसवणूक होत आहे. त्यामुळे कार खरेदी करत असताना सतर्क व्हा.

कार विमा व्यवस्थित पहा

सध्या नवीन कार विमा दोन भागात येत आहे एक म्हणजे तृतीय पक्ष विमा आणि दुसरा म्हणजे सर्वसमावेशक विमा. IRDA (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) कडे थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी निश्चित रक्कम असते, तसेच कोणतीही कंपनी त्यापेक्षा जास्त किंवा कमी प्रीमियमवर थर्ड पार्टी इन्शुरन्सची विक्री करू शकत नाही.

मात्र, सर्वसमावेशक विम्याबद्दल असे होत नाही. कारण तिची IRDA ने कोणतीही रक्कम निश्चित करण्यात आली नाही. यात डीलरशिप त्यांचे मार्जिन (अधिक पैसे, जे डीलरशिपच्या खिशात जातील) जोडून ग्राहकाला विमा विकते.

ऑनलाइन पहा

तुम्हाला आता डीलरशिपची ही हुशारी टाळावी लागणार आहे. यासाठी तुम्ही कार खरेदी करत असताना विम्याचा हप्ता ऑनलाइन पहा. जर तुम्हाला तेथे कमी किंमतीत विमा मिळत असल्यास डीलरशिपला तुम्ही ऑनलाइन मिळणाऱ्या प्रीमियमवरच विमा द्या असे सांगा. समजा तुमच्या जर डीलरशिपने असे केले नाही, तर तुम्हाला त्यांच्याकडून विमा न घेता कारचा विमा ऑनलाइन घेता येते. त्यामुळे तुमच्या हजारो रुपयांची बचत होऊ शकते.