Chanakya Niti : अशा महिलांवर विश्वास ठेवणे असते धोकादायक! उद्ध्वस्त होते आयुष्य; काय सांगतात आचार्य चाणक्य पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chanakya Niti : महान अर्थशास्त्रज्ञ आणि विचारवंत आचार्य चाणक्य हे त्यांच्या धोरणांसाठी खूप प्रसिद्ध आहेत. चाणक्य यांना समाजाची सखोल जाण असल्याने त्यांनी एक धोरण तयार केले होते, ज्यामध्ये त्यांनी लोकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कशा प्रकारे जगावे हे सांगितले आहे.

चाणक्य यांची धोरणे आजच्या काळात खुप प्रासंगिक मानली जातात. काही महिलांवर विश्वास ठेवणे खूप धोकादायक असते, त्या महिलेमुळे एखाद्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. आचार्य चाणक्य याबद्दल काय सांगतात ते सविस्तरपणे जाणून घ्या.

आचार्य चाणक्य यांची जुनी धोरणे आजही प्रासंगिक असून नीती ग्रंथात म्हणजेच चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवन साधे आणि यशस्वी बनवण्याशी संबंधी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी भविष्य उज्ज्वल करण्यासाठी उपाय सांगितले असून त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि वाईट लोकांपासून दूर राहण्याचे मार्ग सांगितले आहेत.

चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये संपत्ती, पत्नी आणि मैत्री यासह सर्व विषयांवर सखोल चर्चा केली आहे. चाणक्यांनी स्त्रियांबद्दल खूप काही सांगितले आहे. म्हणजे उदाहरणार्थ, त्यांचा स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि ते कोणत्या वेळी कसे वागतात. या गोष्टींचा विशेष अभ्यास केला आहे. चाणक्य यांनी आपल्या नीती ग्रंथात असे लिहिलेले आहे की काही स्त्रिया अशा आहेत की त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये.

चाणक्य आपल्या नीती शास्त्रात असे लिहितात

लुब्धन याचक: शत्रु: मूर्ख बोधको रिपु।

जरस्त्रीनाम् पती: शत्रुश्चौरणम चंद्र: रिपु:।

याचाच अर्थ असा आहे की, चोरासाठी, त्याचा सर्वात मोठा शत्रू चंद्र आहे कारण तो नेहमी चोरीसाठी अंधाराच्या शोधात असतो. जेणेकरून त्याची ओळख उघड होणार नाही. मात्र चंद्राचा प्रकाश हा अंधार दूर करत असतो.

या महिलांवर विश्वास ठेवू नये

  • आचार्य चाणक्य यांच्या मते, भ्रष्ट आणि वाईट चारित्र्य असणाऱ्या स्त्रीसाठी असे म्हटले जात आहे की अशी स्त्री कधीही कोणाच्या विश्वासार्ह नसते. ती सतत इतर पुरुषांकडे आकर्षित होत असून तिचा नवरा हा तिच्यासाठी सर्वात मोठा शत्रू असतो कारण तिथे तो तिच्या हेतूंमध्ये अडथळा बनतो.
  • स्त्रीचे सौंदर्य पाहून तिच्यावर विश्वास ठेवणे ही सर्वात मोठी चूक असते. कारण तिच्यात बाह्य सौंदर्यापेक्षा गुण महत्त्वाचे असावेत, सौंदर्यापेक्षा स्त्रीच्या संस्कृतीला आणि शिक्षणाला जास्त महत्त्व दिले पाहिजे.
  • ज्या स्त्रीचा धर्मावर जास्त विश्वास नाही अशा स्त्रीवर कधीही चुकूनही विश्वास ठेवू नये.
  • चाणक्य यांच्या मतानुसार स्त्रीमध्ये लोभाची भावना खूप घातक असते. त्यामुळे घरातील शांतता तर बिघडतेच, परंतु कधी कधी संपूर्ण कुटुंबाचा नाश होतो.
  • माता सरस्वती आणि माता लक्ष्मी दोघीही अशा गर्विष्ठ स्त्रीवर रागावतात. अशा महिलेला तिच्या ज्ञान-बुद्धीचा वापर करता येत नाही. इतकेच नाही तर तिच्या अशा वागण्यामुळे सुख आणि समृद्धीही नष्ट होते.