Cheap Inverter : लाइट गेली तरी करू नका काळजी! आणा ‘हा’ स्वस्तातला इन्व्हर्टर, जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheap Inverter : ग्रामीण भागात लाईट जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि या दिवसात ग्रामीण भागातील लाईट सतत गायब होत आहे. लाईट नसल्याने सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत.

मात्र आता काळजी करू नका. ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण बाजारात सध्या एक इन्व्हर्टर उपलब्ध आहे. ज्यामुळे तुमची ही समस्या दूर होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा इन्व्हर्टर कमी किमतीत खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.

आता वीज गेली तरीही तुमच्या घरात नॉन स्टॉप दिवे आणि पंखे चालू राहू शकतील. उन्हाळ्याच्या दिवसात देशातील काही भागात वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणापासून ते घरातील कामांवर होताना दिसत आहे. या इन्व्हर्टरच्या मदतीने तुमची ही समस्या लगेच सुटू शकते. या इन्व्हर्टरचा बॅटरी बॅकअप अप्रतिम असून रात्रीच्या वेळी लाईट गेल्यास तुम्ही शांतपणे झोपू शकता.

किती असणार किंमत?

या इन्व्हर्टरचे नाव Microtek Digital EB 700 Square Wave Inverter हे आहे. जर तुम्हाला ते खरेदी करायचे असेल तर तुम्हाला Amazon वर जावे लागणार आहे. येथून तुम्ही ते 4,921 मध्ये खरेदी करू शकता. कंपनी यावर 21% सूट देत असून याची मूळ किंमत 6,240 रुपये इतकी आहे, ज्यावर डिस्काउंटनंतर तुम्हाला फक्त 4,921 रुपये द्यावे लागणार आहे.

इतकेच नाही तर तुम्ही ईएमआयद्वारे इन्व्हर्टर खरेदी करू शकता. तुम्ही 235 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. कंपनीचा हा एक अतिशय शक्तिशाली आणि वजनाने हलका इन्व्हर्टर आहे, त्यामुळे ते खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल. जर तुम्हाला उन्हाळ्यात घाम येण्यापासून मुक्ती मिळवायची असल्यास तुम्ही आजच हा मायक्रोटेक इन्व्हर्टर खरेदी करा.