Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Cheapest Laptop : शानदार ऑफर! 90 हजारांचा लॅपटॉप ‘या’ ठिकाणी मिळतोय फक्त 17 हजारांना, कसे ते पहा

सध्याच्या काळात लॅपटॉप हा एक दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. टेक मार्केटमध्येही शानदार फीचर्स असणारे लॅपटॉप दाखल होत आहेत.

Cheapest Laptop : सध्याच्या काळात स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप महत्त्वाचे साधन बनला आहे. ऑफिसच्या कामापासून ते कॉलजेच्या प्रोजेक्टपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी लॅपटॉप खूप उपयोगी येतो. इतकेच नाही तर हा लॅपटॉप सहज कोठेही घेऊन जाता येतो.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे या लॅपटॉपला ग्राहकांची पसंती मिळते. ग्राहकांची ही मागणी आणि गरज पाहता कंपन्याही एकापेक्षा एक शानदार लॅपटॉप्स बाजारात सादर असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शानदार फीचर्स आणि मागणीमुळं या लॅपटॉप्सची किंमत जास्त आहे. परंतु, तुम्ही आता खूप स्वस्तात लॅपटॉप खरेदी करू शकता.

डेलच्या या लॅपटॉपची किंमत 90 हजार रुपये आहे. मात्र हा लॅपटॉप Amazon वर खूपच कमी किमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हाला या डीलचा लाभ घ्यायचा असेल तर ऑफरसाठी अर्ज करावा लागणार आहे.

कुठे मिळत आहे संधी?

डेलचा Latitude E5470 लॅपटॉप Amazon वर सवलतीसह उपलब्ध असून त्यात कंपनीने 8GB RAM + 128GB स्टोरेज दिले आहे. त्याची मूळ किंमत 89,990 रुपये इतकी आहे, परंतु Amazon वर डिस्काउंटसह तो तुम्ही खरेदी करू शकता.

किती मिळत आहे सूट ?

Dell Latitude E5470 Amazon वर 81 टक्के सूटसह सूचीबद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा लॅपटॉप तुम्ही Amazon वर तुम्हाला फक्त 16,740 रुपयांना खरेदी करता येईल.

कसा मिळवायचा लाभ?

खरं तर, हा Amazon वर नूतनीकृत डेल लॅपटॉप आहे. याचा अर्थ असा की त्याची व्यावसायिकरित्या तपासणी, चाचणी आणि ग्राहकाकडून वापर करण्यात आला आहे. हे Amazon Renewed सूचीमध्ये पाहिले जाऊ शकते जे 6 महिन्यांच्या वॉरंटीला समर्थन देत आहे.

Dell Latitude E5470 स्पेसिफिकेशन

Dell Latitude E5470 मध्ये कंपनीने 1366 X 768 रिझोल्यूशनसह 14.1-इंचाचा HD डिस्प्ले दिला आहे. 1.71 किलो वजनाचा हा लॅपटॉप इंटेल कोअर i5 6200U प्रोसेसरसह असून याच्या स्टोरेजचा विचार केला तर यात 8GB रॅम आणि 128GB SSD स्टोरेज देण्यात येत आहे. कंपनीच्या या लॅपटॉपमध्ये Wi-Fi 802.11 ac, USB पोर्ट, मल्टी कार्ड स्लॉट पोर्ट आणि ब्लूटूथचा कनेक्टिव्हिटी सपोर्ट उपलब्ध असणार आहे.