Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Citroen C3 Shine : मस्तच! जबरदस्त मायलेजसह Citroen ची नवीन कार बाजारात दाखल, किंमत आहे फक्त…

जर तुम्ही नवीन कार घेण्याच्या विचारत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण बाजारात एक शानदार मायलेज असणारी कार आली आहे.

Citroen C3 Shine : सध्या इंधनाचे दर वाढले असल्याने आता ग्राहक कारचे मायलेज पाहून कार खरेदी करत आहेत. अशातच आता Citroen ने आपली आगामी कार C3 Shine बाजारात लाँच केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाहते अनेक दिवसांपासून या कारची आतुरतेने वाट पाहत होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

इतकेच नाही तर कंपनीही या कारवर अनेक दिवसांपासून काम करत होती. मजबूत इंजिनसह कंपनीकडून आगामी कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येत आहे. या कारला एक नवीन स्टायलिश लूक मिळत असून जर तुम्ही नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर Citroen ची ही कार उत्तम पर्याय आहे.

जाणून घ्या Citroen C3 शाइन फीचर्स

कंपनीकडून नवीन Citroen C3 Sign मध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. यात कंपनीने Citroen Connectivity 1.0 प्लॅन अंतर्गत समायोज्य ORVMs, मागील पार्किंग कॅमेरा, 15 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, फॉग लाइट्स, रिअर वायपर आणि वॉशर, रिअर स्किड प्लेट्स, रिअर डीफॉगर, 35 स्मार्ट कनेक्टिव्हिटी यांसारखी जबरदस्त फीचर्स दिली जात आहेत.

कसे असेल इंजिन?

आपल्या सर्व कारप्रमाणे कंपनीने या कारमध्ये मजबूत इंजिनही दिले आहे. कंपनीने यात दोन इंजिनचे पर्याय दिले असून पहिले 1.2 लीटर 3 सिलेंडर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन आहे. तर हे इंजिन 82 HP कमाल पॉवरवर 115 Nm पीक टॉर्क निर्माण करते. इतकेच नाही तर, कंपनीने याला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. तर दुसरे इंजिन 1.2 लिटर 3 सिलेंडर टर्बोचार्ज करण्यात आलेले पेट्रोल इंजिन आहे. हे 110 Bhp पॉवर आणि 190 Nm टॉर्क निर्माण करत असून हे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे.

किंमत

कंपनीकडून या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 7.87 लाख रुपयांपर्यंत ठेवली गेली आहे. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम कार घेण्याच्या विचारात असल्यास कंपनीची ही मस्त कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल.