Citroen eC3 : स्वस्तात मस्त! टाटा Tiago EV ला टक्कर देते ‘ही’ इलेक्ट्रिक कार, जबरदस्त रेंजसह किंमतही खूपच कमी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Citroen eC3 : देशात इंधनाचे दर वाढत असल्याने आता ग्राहक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू लागले आहेत. त्यामुळे अनेक दिग्ग्ज कंपन्याही भारतीय बाजारात शानदार फीचर्स आणि उत्तम रेंज असणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहेत. अशातच आता भारतीय बाजारात Citroen eC3 ही इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कार टाटा Tiago EV ला थेट टक्कर देत आहे. या कारचे बुकिंगही सुरु झाले आहेत आणि या कारमध्ये कंपनी जबरदस्त फीचर्स देत आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही कार उत्तम पर्याय आहे.

सिट्रोन eC3

सिट्रोन eC3 या कंपनीकडून इलेक्ट्रिक कारमध्ये 29.2 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला असून जो 56 bhp आणि 143 Nm टॉर्क जनरेट करत आहे. कार 0-100 किमीचा वेग 6.8 सेकंदात मिळवते. कंपनीने या कारबाबत असा दावा केला आहे की जी फक्त एका चार्जवर 320 किमीच्या रेंज देते. 15amp सॉकेटद्वारे त्याची बॅटरी 10 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी एकूण 10.5 तासांचा वेळ लागतो.

किती आहे Citroen eC3 ची किंमत

अजूनही या कंपनीकडून सध्या या कारच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते, या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 11.50 लाख रुपये ठेवली असून त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 12.76 लाख रुपये इतकी आहे.

तसेच तुम्हाला या कारमध्ये जबरदस्त सेफ्टी फीचर्स पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर सिट्रोएनची ही डॅशिंग कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. इतकेच नाही तर या कारचा लुकही खूप स्टायलिश असणार आहे.