रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय अजून झाला नाही.या संदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यांच्याशी योग्य वेळी चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

ते जालन्यात बोलत होते. केंद्राने केरळ आणि महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लावावी अशी शिफारस केलेली आहे मात्र मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय घेतील असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दोन डोस घेणे बंधनकारक राहणार असून हे नियम चाकरमान्यांनी पाळावे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात सरकारच्या नकारानंतर देखील दहीहंडी साजरी करणार या मनसेच्या निर्णयावर देखील टोपे यांनी भाष्य केलं. सण -उत्सव सर्वांनाच्याच आवडीचे असतात मात्र नियमात राहूनआणि शासनाच्या नियमांचं पालन करून दहीहंडी साजरी करावी असं आवाहन टोपे यांनी केलं.

तसेचं मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजप राज्यभर शंखनाद आंदोलन करत आहे. मात्र सध्या सर्वांनी जनहिताच्या नियमांचं पालन करावं असंही त्यांनी सांगितलं.

राज्यात कोरोना बाधितांचा आकडा घटत असून मृत्यूचा आकडा देखील घटत आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. जो डॉक्टर कोरोना बाधितांची हेळसांड करतो त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.