Income Tax : 10 दिवसात पूर्ण करा ‘हे’ काम, नाहीतर तुम्हालाही द्यावा लागेल जास्त कर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax : देशातील कितीतरी नोकरी करणारे, व्यवसाय करणारे लोक लाखो रुपयांचा कर भरत असतात. तसेच काहीजण कर भरत नाहीत. लवकरच आर्थिक वर्ष 2023 संपत आहे आणि नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे.

त्यामुळे आयकर विभागाकडून करदात्यांना कर भरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अशातच काही जण कर टाळण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतात. जर तुम्हीही असा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता योजनांमध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकता.

कर बचत

अशा अनेक बँका आहेत ज्या 6.50 टक्क्यांपासून ते 7.60 टक्क्यांपर्यंत टॅक्स सेव्हिंग एफडीवर व्याज देत आहेत. तुम्ही आता टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करून आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत तुम्हाला तुमचा कर वाचवता येतो. हे लक्षात घ्या की ज्या लोकांनी जुन्या कर प्रणालीचा पर्याय निवडला आहे तेच याद्वारे कर सूट घेऊ शकतात. नवीन कर प्रणाली अंतर्गत, FD द्वारे कर बचतीचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.

काय आहे कर बचत एफडी?

हे लक्षात घ्या की केवळ व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF) कर बचत एफडीमध्ये गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुले त्यांच्या पालकांच्या मदतीने गुंतवणूक करू शकतात. टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. तर पुढचे आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी सुमारे 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात कर बचतीची एफडी करून, आयकर भरताना त्याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. तसेच हे देखील लक्षात ठेवा की कर बचत एफडीचा परिपक्वता कालावधी पाच वर्षांचा आहे.

आयकर रिटर्न

जर तुम्ही आर्थिक वर्ष 2023 संपण्यापूर्वी कर वाचवण्याचा पर्यायाच्या शोधात असाल, तर कर बचत FD हा एक उत्तम पर्याय असू शकतो. अनेक बँका आकर्षक व्याजदरांसह हा पर्याय ऑफर करतात आणि ते तुम्हाला आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर वाचवण्यास मदत करू शकतात. तसेच गुंतवणूक करण्यापूर्वी परिपक्वता कालावधी आणि तरलता आवश्यकता विचारात घेणे खूप गरजेचे आहे.