file photo

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. यातच जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. ७ सप्टेंबर रोजी ५९ हजार ४१, ८ सप्टेंबर रोजी विक्रमी ८९ हजार २५७, तर ९ सप्टेंबर रोजी ४० हजार ३०३ असे तीन दिवसांत एकूण १ लाख ८८ हजार ६०१ डोस देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी लसीकरणाचा वेग कमी होता. मात्र, हळूहळू हा वेग वाढवण्यात आला. आता १८ वर्षांपुढील सर्वांचेच लसीकरण करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाचे हे महत्वाचे पाऊले ठरत आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यात ३८ लाख ८७ हजार ७६४ जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत १५ लाख २६ हजार २११ जणांना पहिला डोस (३९.२५ टक्के), तर ५ लाख ५७ हजार ७८२ जणांना दुसरा डोस (१४.३४ टक्के) देण्यात आला आहे.

असे एकूण २० लाख ८३ हजार ९९३ डोस आतापर्यंत संपले आहेत. जिल्ह्यात सर्व केंद्रांवर मिळून शनिवारी (दि. ११) सुमारे १ लाख डोसच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण दिवसभरात संपले तर तो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा ठरेल. त्यादृष्टीने सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी नियोजन करत आहेत.