Cotton Rate : कापसाचा भाव झूकेगा नहीं….!! यामुळे कापसाच्या दरात झाली वाढ; पण, कसे असतील भविष्यात दर? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate : भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन (Cotton Production) घेतले जाते. आपल्या राज्यात कापसाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच खानदेश (Khandesh) कापसाच्या उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.

खानदेशात कापसाचे विक्रमी उत्पादन दरवर्षी शेतकरी बांधव (Farmers) घेत असतात. यावेळी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना (Cotton Grower Farmers) कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव (Cotton Market Price) मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर मोठे समाधान बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने शेतकरी सुखावला आहे.

कोणाला मिळतोय जास्त फायदा
कापसाच्या दराने गेल्या 50 वर्षांचा उच्चाँकी स्तर गाठला असून या दरवाढीचा फायदा मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांना झाला आहे. या वाढलेल्या दराचा फायदा त्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झाला आहे ज्यांनी आपला कापूस काही काळ साठवला होता.

आता कापसाचा हंगाम संपत आला तरी बाजारात कापसाची मागणी कायम असून दरात वाढ होत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकऱ्यांच्या कापसाला एवढा चढा भाव मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कापसाला विक्रमी दर मिळण्याचे कारण काय?
खरं पाहता, दीड-दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या रुस-युक्रेन युद्धामुळे सर्वच पिकांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. यामध्ये गहू आणि मोहरी हे प्रमुख असून यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये आता कापसाचा देखील समावेश झाला आहे. कापसाच्या तेजीचे आणखी एक कारण म्हणजे -मित्रांनो खरीप हंगामात गुलाबी बोन्ड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे नुकसान झाले असून, त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे.

त्यामुळेच बाजारपेठेत कापसाच्या मागणीनुसार उत्पादन होऊ शकले नाही, परिणामी भावात तेजीचा कल दिसून येत आहे. कापसाचे भाव सध्या विक्रमी पातळीवर असून शेतकऱ्यांसाठी पैसे कमवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

सध्या बाजारात कापसाची आवक बऱ्यापैकी असल्याने पुढील 10 दिवस अधिक खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.

आपल्या महाराष्ट्रात कापसाचा भाव 14 हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या भावाने 14,000 रुपयांची विक्रमी पातळी गाठली आहे. यंदाच्या हंगामात आपल्या राज्यातील प्रमुख मंडईत कापसाचे भाव एकदाही घसरलेले नाहीत.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा सर्वाधिक भाव मिळत आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळत असल्याने येत्या खरीप हंगामात कापसाखालील क्षेत्र जास्त अपेक्षित असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

अशा स्थितीत कापूस उत्पादक शेतकरी आता अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीसाठी रस दाखवू शकतात. मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, वर्धामधील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला सरासरी भाव 13200 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला भाव 12880 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. त्याच वेळी, महाराष्ट्रातील इतर मंडईंमध्ये कापसाचा भाव 12,600 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कायम राहिला आहे.

कापसाला हमीभावापेक्षा अधिक बाजारभाव
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गुणवत्तेनुसार, कापसाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव अनुक्रमे 5726 रुपये आणि 6025 रुपये आहे प्रति क्विंटल एवढा आहे. पण मात्र खुल्या बाजारात कापसाचा भाव 12 हजारांच्या वर कायम आहे.

अशाप्रकारे, MSP आणि बाजारभाव यामध्ये दुपटीचा फरक आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपला कापुस एमएसपीवर विकण्याऐवजी व्यापाऱ्यांना बाजारात विकली, त्यांना त्यातून चांगला नफा झाला. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली होती, त्यांना देखील कापसाच्या बाजार भाव वाढीचा फायदा होतं आहे.

भविष्यात कसे असतील कापसाचे दर
सध्या तरी कापसाचे भाव तेजीत बघायला मिळाले आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कापसाच्या भावात घट होण्याची शक्यता फारच कमी आहे. कापूस साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना आता लाभ मिळत आहे. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, सध्या तरी कापसाचे भाव चढेच राहणार आहेत.