Covid-19 effects in woman : कोरोनामुळे मासिक पाळीवर परिणाम होतो का? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Covid-19 effects in woman : कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येत घट झाली तरी अद्याप कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांच्या काही शारीरिक भागावर हल्ला केला आहे. यामध्ये महिलांना मासिक पाळीच्या (Mentrual Cycle) समस्येला (Problem) मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागते.

अपोलो हॉस्पिटलमधील (Apollo Hospital) ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक गायनॅकॉलॉजीच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. सारिका गुप्ता (Dr. Sarika Gupta) महिलांच्या मासिक पाळीवर कोविड-19 च्या दुष्परिणामांविषयी सांगितले आहे.

ज्या महिलांना कोरोनाचे निदान झाले आहे त्यांना मासिक पाळीच्या अनियमिततेचा सामना करावा लागत आहे, असे त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या तज्ञांना असे आढळून आले आहे की कॉर्टिसॉल (Cortisol) या तणाव संप्रेरकाचे उत्सर्जन हे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी येण्याचे महत्त्वाचे कारण असू शकते.

कॉर्टिसॉल हा तणाव संप्रेरक शरीराला धोक्यापासून लढण्यास मदत करतो. डॉ. सारिका यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात मासिक पाळीत होणारे बदल आणि लैंगिक वर्तन या दोन प्रमुख समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

मासिक पाळीला उशीर

होण्यामागे हार्मोन्स, पीसीओएस इत्यादी बदल होऊ शकतात. तथापि, डॉ सारिका यांच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 रुग्ण असल्याने त्याची शक्यता वाढते. 2021 मध्ये रिप्रॉडक्टिव्ह बायोमेडिसिन ऑनलाइन नावाच्या मासिकाने देखील हे सिद्ध केले होते.

177 कोविड पॉझिटिव्ह महिलांच्या मासिक पाळीचा मागोवा घेतल्यानंतर, असे आढळून आले की त्यांच्यापैकी बहुतेकांना मासिक पाळीच्या समस्या होत्या. 34% महिलांना 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीनंतरही मासिक पाळी येत नाही.

लैंगिक वर्तणुकीचे नमुने

अभ्यासात असे आढळून आले की अनेक स्त्रियांनी त्यांच्या लैंगिक वर्तनातही बदल नोंदवले आहेत. असे मानले जाते की याचे मूळ कारण विषाणूमुळे बराच काळ अलगावमध्ये राहणे असू शकते. ज्या महिलांनी नैराश्यविरोधी औषधे घेतली त्यांच्यामध्ये परिणाम अधिक तीव्र होते.

कोविड-19 मधून बरे होण्याचे मार्ग

डॉ. सारिका सुचवतात की कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर महिला त्यांच्या स्त्रीरोग आरोग्य सुधारण्यासाठी अनेक गोष्टी करू शकतात. ध्यान, योग आणि ताची, जे तणावमुक्त होण्यास मदत करतात आणि शरीरावर सकारात्मक परिणाम करतात, त्यांचा अवलंब करावा.

याशिवाय, दररोज जॉगिंग, धावणे, सायकलिंग आणि पोहणे हे देखील बरे होण्याचे चांगले मार्ग आहेत. जेवणात भाज्या, दूध, फळे खा. याशिवाय मासिक पाळीत जास्त असामान्यता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.