Ola Electric : ग्राहकांनो..! कंपनी आता इलेक्ट्रिक स्कूटरचा ‘हा’ भाग बदलणार, जाणून घ्या डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ola Electric : दरवर्षी ओला आपल्या कितीतरी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत असते. कंपनी यात अनेक जबरदस्त फीचर्स देत असते. तसेच किमतीही कमी प्रमाणात असतात. इतकेच नाही तर कमी किमतीत जास्त मायलेज मिळत आहे.

या कंपन्या बाजारातील इतर दिग्ग्ज कंपन्याना कडवी टक्कर देत असतात. अशातच जर तुम्ही ओलाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा एक खास भाग मोफत बदलणार आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील

अपडेटेड सस्पेंशन युनिटची चाचणी करण्यात येणार

कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षा आणि दर्जा यात महत्त्वाचे बदल केले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून कंपनीकडून सस्पेंशनबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर हा बदल केला आहे. कंपनीच्या मते, सध्याच्या सिंगल-साइड फ्रंट फोर्क युनिटमध्ये काहीही चुकीचे नाही. अपडेटेड सस्पेंशन युनिटची कसून चाचणी केली आहे. स्थिरता आणि शक्ती आणखी वाढवण्यासाठी कंपनीकडून नुकतेच फ्रंट फोर्क डिझाइन अपग्रेड करण्यात आले आहे.

सीटची उंची

कंपनीने Ola S1 आणि S1 pro दोन्हीमध्ये ड्युअल-पॉड एलईडी हेडलाइट्स देण्यात आले आहेत. यात 7.0-इंचाचा टचस्क्रीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहे. या दोन्ही ई-स्कूटर 12-इंच ब्लॅक-आउट अलॉय व्हीलवर चालतात. कंपनीच्या या स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज 135 किमी आहे. तिचा टॉप स्पीड 116 किमी प्रतितास इतका आहे. तिची बॅटरी सहा तासांत पूर्ण चार्ज होते. तसेच तिच्या सीटची उंची 792 मिमी इतकी आहे.